🟣 राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जुन खर्गेंच्या थेट फोनने पृथ्वीराजबाबांचा भाजप प्रवेश बारगळला
🟣 मलिकार्जुन खर्गे यांची प्रदेश काँग्रेस नेत्यांना कडक सूचना
🟣 बंटी पाटील, विश्वजीत कदम यांची शिष्टाई
______________________
जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांकडून जाणीवपुर्वक होणारी गळचेपी, विधानसभा निवडणुकीत सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार असताना काँग्रेस विरोधात उघड प्रचार करणारे अपक्ष खासदार विशाल पाटील यांची काँग्रेस पदाधिकारी निवडीत होणारी लुडबुडमुळे नाराज झालेले काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील यांचा भाजप प्रवेश राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे यांची प्रदेश काँग्रेस नेत्यांना कडक सूचना, खर्गेंचा थेट पृथ्वीराजबाबांना फोन तसेच, बाळासाहेब थोरात, बंटी पाटील, विश्वजित कदम यांच्या शिष्टाईनंतर बारगळला.
सांगली-मिरजसह महापालिका क्षेत्राचा सर्वांगीण विकास आणि कार्यकर्त्यांना योग्य सन्मान होईल असा निर्णय घेणार असल्याचे पृथ्वीराजबाबा पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
"... म्हणून पृथ्वीराजबाबासाठी काँग्रेस आग्रही...
पृथ्वीराजबाबा पाटील यांचे वडील माजी खासदार व महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे माजी अध्यक्ष, सहकार महर्षी कै. गुलाबराव पाटील साहेब हे माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांचे विश्वासू होते. पृथ्वीराजबाबा पाटील यांनी सुध्दा काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ राहिले आहेत. मात्र, बाबांची वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसोबत असणारी जवळीक ही जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना खुपसत असे... यातून बाबांना जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रकार काँग्रेस नेत्यांकडून होत आहे. त्यामुळे नाराज असलेले पृथ्वीराजबाबा काँग्रेसचा त्याग केल्यास सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नकारात्मक संदेश जाईल. म्हणून काँग्रेस श्रेष्ठी पृथ्वीराजबाबा संदर्भात गंभीर असल्याचे दिसते."