🔴 मिरजेतील सराईत गुन्हेगार जयंत पाटलांच्या गोट्यात तर, जनसुराज्य नेते समित कदम यांच्या वाढदिवस शुभेच्छा बॅनरवर
🔴 जयंत पाटील साहेब, समितदादा मिरजेत अशा सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांना उमेदवारी देणार का..?
आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि जनसुराज्य पक्ष मिरजेत उमेदवारी देताना " गुन्हेगार " हाच निकष ठेवणार आहेत का..? असा प्रश्न मिरजकरांना पडला आहे.
मिरज रेल्वे जंक्शन ऑइल डेपो पेट्रोल-डिझेल चोर टोळीचा मोरक्या, अफगाण हॉटेल हल्ला प्रकरणी सुमारे सात महिने फरार असलेल्या प्रमुख आरोपी सराईत गुन्हेगार असलम महंमद काझी हा कधी जनसुराज्य पक्षाचे नेते समितदादा कदम यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनरवर तर, कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेबांच्या गोट्यात दिसत असल्याचे चित्र आहे.
मिरज शहरात सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा वानवा आहे का..? जे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) असो की जनसुराज्य पक्ष असो... अशा राजकीय पक्षांच्या नेत्यांना असलम काझी सारख्या सराईत गुन्हेगारांना घेऊन सार्वजनिकरित्या वावरताना सामाजिक तत्वांचा विसर पडला का...? असा प्रश्न आम्हा मिरजकरांना पडला आहे.