yuva MAharashtra 🟣 मिरजेला शासन नियुक्त सहाय्यक आयुक्त नेमा 🟣 मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांची घेतली भेट

🟣 मिरजेला शासन नियुक्त सहाय्यक आयुक्त नेमा 🟣 मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांची घेतली भेट

 


 🟣 मिरजेला शासन नियुक्त सहाय्यक आयुक्त नेमा

🟣 मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांची घेतली भेट

🟣 मिरज कार्यालयातील अनेक विभाग अधिकारीविना



◆ सांगली एवढीच मिरज शहराची लोकसंख्या आहे. शहरात अतिक्रमण, आरोग्यबरोबरच अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी सहाय्यक आयुक्त पद महत्त्वाचा असतो. मात्र, प्रशासकीय सोयीसाठी एखाद्या लिपिकाला प्रभारी सहाय्यक आयुक्त पदाची जबाबदारी दिली जाते. मात्र, त्या अधिकाऱ्याकडे निर्णय घेण्याची क्षमता नसल्याने मिरजेत नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे.  म्हणून मिरज विभागीय कार्यालयात शासन नियुक्त सहाय्यक आयुक्त नेमण्याची तसेच, शहराला पुर्ण वेळ अतिरिक्त आयुक्त देण्याची, अशी आग्रही मागणी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे केली आहे.  

◆ मंगळवारी मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, जहिर मुजावर, नरेश सातपुते, तौफिक देवगिरी, रामलिंग गुगरी, दिनेश तामगावे, अभिजित दाणेकर,  वसीम सय्यद आदी सदस्यांनी सांगली मुख्यालयात आयुक्त सत्यम गांधी  यांची भेट घेतली. 

◆ शहरातील रखडलेले छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, शाहू चौक ते पोलीस स्टेशन, अब्दुल करीम खां चौक ते पोलीस स्टेशन, गांधी चौक ते महाराणा प्रताप चौक आणि किसान चौक ते शास्त्री चौक या रस्त्यांचे रुंदीकरण, रस्ता कामातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी रोड रजिस्टर ठेवणे, भटकी कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त, मिरज कार्यालय नूतनीकरण आणि शहरातील जटिल होत चाललेले अतिक्रमण समस्या आदी विषयांवर चर्चा केली. 

◆शहरातील नागरी प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी मिरज विभागीय कार्यालयात शासन नियुक्त सहाय्यक आयुक्त नेमणे तसेच, पूर्ण वेळ अतिरिक्त आयुक्तबरोबरच उपयुक्तांना धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार, अतिक्रमणसाठी स्वतंत्र अधिकारी आणि पूर्ण वेळ आरोग्यधिकारी नेमण्याची मागणी केली.