yuva MAharashtra छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याची श्वेत पत्रिका प्रसिध्द करा

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याची श्वेत पत्रिका प्रसिध्द करा




🔴
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याची श्वेत पत्रिका प्रसिध्द करा  

🔴निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या सहा महिन्यांत रस्त्याची वाताहात

🔴नियोजनशुन्य धोरणाने दुभाजकामुळे अपघातही वाढले

🔴मिरज सुधार समिती पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात


----------------------------------------------------------------
        मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट झाल्याने अवघ्या सहा महिन्यांत रस्त्याची वाताहात झाली आहे.  रस्त्याच्या दुतर्फा गटारीचे काम होणे आहे. रस्त्याच्या मध्यभागी बसविण्यात येत असलेल्या दुभाजकाबाबत निश्चित धोरण नसल्याने मार्गावर अपघातही वाढले आहेत. म्हणून, कोट्यावधी रूपयांची उधळपट्टी झालेल्या  छत्रपती शिवाजी महाराज रस्त्या कामाचाच्या दर्जा तपासण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उच्चस्तरीय समितीमार्पâत चौकशी करुन या कामाचा श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी मिरज सुधार समितीने केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.  
        
          
शिवाजी महाराज या नावाने ओळखला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६  सुमारे १०.८०० किमी रस्ता होण्यासाठी मिरज सुधार समिती गेल्या पाच वर्षापासून अखंडितपणे पाठपुरावाबरोबरच दोन वेळा आमरण उपोषण आंदोलन केले. रस्त्यासाठी २४ कोटींचा निधी मंजूर झाला. हे काम निर्माण कंस्ट्रक्शन, कोल्हापूरच्या कंपनीने केवळ १७ कोटींना घेतले. संबधित कामाचा ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्या अवघ्या सहा महिन्यांत रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडून रस्त्याची वाताहात झाली आहे. रस्त्यावरील पाणी निचऱ्यासाठी दोन्ही बाजूला गटारीचे कामही अद्याप झालेले नाही. रस्त्त्याच्या मध्यभागी दुभाजका बसविण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या जिल्हा सुरक्षा समिती  यांच्यात संवाद नसल्याने चुकीच्या पध्दतीने दुभाजक बसविले जात असल्याने दररोज लहानमोठे अपघात घडत आहेत. रस्ता रुंदीकरणासह अन्य कामे अजूनही प्रलंबित आहेत.

        म्हणून सुमारे १७ कोटींचा निधीचा चुराडा करुन तयार करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामाची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां मार्फत स्वतंत्र समिती स्थापन करण्यात यावी. तसेच, या रस्त्याचे श्वेतपत्रिका प्रसिध्द करावी, अशी मागणी मिरज सुधार समितीने केली आहे. यावेळी मिरज सुधार समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, उपाध्यक्ष संतोष जेडगे, नरेश सातपुते, तौफिक देवगिरी, वसीम सय्यद, शब्बीर बेंंगलोरे, दिनेश तामगावे, युसूफ निशानदार आदी सदस्य उपस्थित होते.