🔵कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाने मिरज, सांगली, सातारा, बेळगाव भागातील विकासाला मिळणार चालना,
🔵भूसंपादन सुरू करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
🔵रेल्वे प्रकल्पासाठी 5000 कोटींची तरतूद
🔵पश्चिम महाराष्ट्र कोकणशी जोडला जाणार
अनेक वर्षांपासूनचे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणवासीयांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू करा, असे आदेश गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मार्गाला मंजुरीची घोषणा करत, २५ फेब्रुवारी २०१६ रोजी ३,२४४ कोटी रुपयांच्या मार्गाला मंजुरी दिली. त्यापैकी केंद्र शासनाच्या १,३७५ कोटी रुपयांची तरतूदही केली होती.
एकूण लांबी : १०७.६५ कि.मी.भूसंपादन : ६३८.६हेक्टर खर्च: ५,००० कोटी (अंदाजे)२७ बोगदे, ५५ उड्डाणपूल या मार्गावर
२८ कि.मी. लांबीचे एकूण २७ बोगदे असतील. यासह रस्त्यावरील ५५ उड्डाणपूल आहेत. निसर्गाच्या कुशीतून जाणारा हा मार्ग आहे, सर्वात मोठा बोगदा ३.९६ कि.मी. लांबीचा आहे. २ कि. मी. पेक्षा जादा लांबीचे ३, तर त्यापेक्षा कमी लांबीचे २४ बोगदे असतील. या मार्गावर रस्त्यावरील ५५ उड्डाणपूल, रस्त्याखालील ६८ पूल असतील. यासह छोटे पूल ७४, तर मोठे पूल ५५ असतील. या मार्गावर एकूण दहा स्थानकेही प्रस्तावित केली आहेत.
सातत्याने पाठपुरावा आवश्यक : ऍड. ए. ए. काझी (संस्थापक : मिरज सुधार समिती)
कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासाठी गेल्या चार दशकापासून मागणी आहे. आता या मागणीला मूर्त स्वरूप येत आहे. हे प्रकल्प बिग बजेटचा असल्याने प्रकल्पासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा आणि बेळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीबरोबरच मिरज सुधार समिती, रेल्वे प्रवासी संघासारख्या संघटनांचा सातत्याने पाठपुरावा आवश्यक आहे.
