◆ .. ही विकृती येतंय कुठून...?
◆ पोलिसांच्या नाकावर ठिचून वाजविले जाते DJ...
______________________
◆ काल शनिवारी सायंकाळी ब्राह्मणपुरी परिसरातील एका धार्मिक स्थळ समोरून जाणाऱ्या लग्नाच्या मिरवणुकीच्या DJ धनधनाटात नाचणाऱ्या भूषण महेश पवार (रा. तासगाव जि. सांगली) या विकृत तरुणाने त्या धार्मिक स्थळाच्या भिंतीवर उभे राहून नंगा नाच केल्याचा निंदनीय प्रकार घडला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरेत कैद सुध्दा झाला. ही बाब त्या धार्मिक स्थळ व्यवस्थापन समिती समजल्यानंतर त्या धार्मिक स्थळ संबंधित समाज्याच्या नागरिकांच्या जमावाने मिरज शहर पोलीस ठाण्यासमोर प्रचंड गर्दी केली.
◆ मात्र, पोलीस उपअधिक्षक प्रणिल गिलडा सर आणि पोलीस निरीक्षक किरण रासकर सर यांनी अतिशय सुनियोजितपणे परिस्थिती हाताळत भिंतीवर नाचणाऱ्या त्या विकृत प्रवृत्तीच्या भूषण पवार याला चोप देत त्याच्यावर अटकेची कारवाई केल्याने संतप्त झालेला जमाव शांत झाला.
◆ यातून एक बाब मिरज सुधार समितीच्या माध्यमातून प्रशासनास सूचित करावे असे वाटते की, भूषण महेश पवार या तासगावच्या तरुणाने धार्मिक स्थळाच्या भिंतीवर चढून नंगा नाच करण्याचे धाडस केला कसा..? याला कोणी असं कृत्य करण्यास कोणी प्रवृत्त केले का...? यातून कोणत्या विकृत प्रवृत्ती शक्तीला मिरजेची शांतता भंग करायचं षडयंत्र आहे का..? हे तपासण्याची गरज आहे.
◆ शिवाय, धार्मिक उत्सवसोबत आता लग्नासारख्या खासगी कार्यक्रमाच्या मिरवणुकीला सुध्दा पोलीस प्रशासन DJ बाबत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांना मुरड घालून DJ वाजविण्यास परवानगी देतेच कशी..? पोलीस प्रशासन राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावर अशा प्रकारे नियमांना मुरड घालून DJ ला परवानगी देत असेल तर ही बाब निश्चितच सामाजिक चिंताजनक आहे.
◆ कोणताही सण, उत्सवाच्या वेळी त्या धार्मिक स्थळाला पोलीस बंदोबस्त असतो. शिवाय, बकरी ईदच्या दुसऱ्या दिवशी हा प्रकार घडला आहे. त्यावेळी येथील बंदोबस्ताला असलेलं पोलीस कुठे गायब झाले होते...? शिवाय, संजय शिरोळे नामक व्यक्तीच्या लग्नाच्या मिरवणूक मार्गावर धार्मिक स्थळ असताना बंदोबस्त शिवाय मिरवणूकिला परवानगी दिली कशी..? असे काही अनुत्तरित प्रश्न आहेत.
◆ काल शनिवारचा प्रकार त्या धार्मिक स्थळ व्यवस्थापन समिती, त्या संबंधित समाजातील शांतता प्रिय नागरिकांमुळे आणि ऐनवेळी पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे या "नंगा नाच" विषयावर पडदा पडला. पण, मिरज सारख्या संवेदनशील शहरात कोणत्याही मिरवणूकिला परवानगी देताना तरुणांईच्या गांडीत "किडा" उठवणाऱ्या DJ ला परवानगी देताना सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
◆ अन्यथा कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडून अश्या DJ ला परवानगी देऊ नये... कारण कालच्या सारखी अप्रिय घटनेचे काही पडसाद उमटले असते तर पोलिसांना आणि पर्यायाने शहराला भोगावे लागते.. याचे भान पोलीस यंत्रणेने ठेवावी, हीच अपेक्षा... (कारण 2009ला आमचे हात पोळलं आहे) ☹️😡
आपल्या हक्काची... मिरज सुधार समिती.