yuva MAharashtra म्हैसाळ-कागवाड रस्त्याची चाळन 🔴 रस्त्यावरील खड्डयात पाणी साचल्याने दररोज अपघात..

म्हैसाळ-कागवाड रस्त्याची चाळन 🔴 रस्त्यावरील खड्डयात पाणी साचल्याने दररोज अपघात..

 




🔴 म्हैसाळ-कागवाड रस्त्याची चाळन

🔴 रस्त्यावरील खड्डयात पाणी साचल्याने  दररोज अपघात..

🔴 मिरज सुधार समितीकडून रस्त्याचा पंचनामा.

महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन महत्त्वाच्या राज्यांना जोडणारा म्हैसाळ-कागवाड रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर एक फूट खोलीची खड्डे आणि त्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते. तर, या खड्ड्यामुळे मिरजेत येणाऱ्या रुग्णांची संख्या सुध्दा घटली आहे. गुरुवारी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याचा पंचनामा करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना जाब विचारत किमान पावसाळ्यात सिमेंटने खड्डे भरून घेण्याची मागणी केली आहे.


महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांना जोडणारा म्हैसाळ-कागवाड हा रस्ता क्र. 160 हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अखत्यारीत येतो. दुपदरी रस्ता असल्याने या रस्त्यावर 24 तास वर्दळ असते. मात्र, या रस्त्याच्या देखभालीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष असल्याने रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी एक फूट खोलीचे मोठे खड्डे पडले आहेत. 

सद्या पावसाळा सुरू असल्याने पावसाचे पाणी खड्डयात साचून राहत असल्याने वाहनधारकांना खड्डयाचा अंदाज येत नसल्याने  दररोज लहान-मोठे अपघात घडत असल्याने वाहनधारक मेटाकुटीस आले आहेत. याबाबत अनेक वाहनधारकांनी मिरज सुधार समितीकडे तक्रार केल्यानंतर गुरूवारी मिरज सुधार समितीचे ऍडव्होकेट ए. ए. काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, कार्यवाह असिफ निपाणीकर नरेश सातपुते, रामलिंग गुगरी, अभिजित दानेकर, वसीम सय्यद, तौफिक देवगिरी, शब्बीर बेंगलोरे, सिद्धार्थ पोळ आदी सदस्यांनी या रस्त्याची पाहणी करीत पंचनामा केला. या रस्त्यावरील खड्ड्यांच्या व्हिडिओ क्लिप थेट केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयास पाठविले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग कोल्हापूर परिमंडळ अधिकाऱ्यांना जाब विचारत रस्त्यावरील खड्डे सिमेंटने भरून घेण्याची मागणी केली आहे.