yuva MAharashtra चार महापौरपद मिळूनही मिरजेचा विकास का नाही...? भेटीला गेलेल्या मिरजेच्या नेत्यांचे अजितदादांनी पिळले कान...

चार महापौरपद मिळूनही मिरजेचा विकास का नाही...? भेटीला गेलेल्या मिरजेच्या नेत्यांचे अजितदादांनी पिळले कान...

 


चार महापौरपद मिळूनही मिरजेचा विकास का नाही...? 

भेटीला गेलेल्या मिरजेच्या नेत्यांचे अजितदादांनी पिळले कान...

शहरात स्वच्छतेसह नागरी सुविधांचा बोजवारा 

खराब व अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीची जटील समस्या 

भाजी मंडईचा प्रश्नही खितपत 

नेत्यांकडून केवळ आश्वासनांची धुळफेक 


महापालिका स्थापनेनंतर गेल्या २७ वर्षाहून अधिक काळ मिरजेतील कारभाNयांचे महापालिकेच्या राजकारणावर वर्चस्व राहिले आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या मिरज शहरासाठी शेकडो कोटी मिरजेसाठी निधी दिला हा निधी कुठे खर्च झाला.? मिरजेला चार वेळा महापौरपद मिळूनही मिरजेचा विकास का झाला नाही? असे म्हणून राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार गट) अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामतीस भेटण्यास गेलेल्या मिरजेतील नेत्यांचे कान पिळले.  थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांसमोर तोंडघशी पडूनही स्वत:ला कार्यसम्राट म्हणून घेणार्या  या मिरजेतील नेत्यांना याची कसलीच लाज वाटली नाही...? हे विशेष...!


गेली अनेक वर्षे शहरातील राजकारणात मिरज पॅटर्नचे वारे नायकवडी, जामदार आणि आवटी या घराण्यातच घोंगावत आहे. यात माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी स्थायी समिती सभापती महादेव कुरणे आणि माजी नगरसेवक कै. महंमद काझी यांचीही भूमिका अनेक वेळा महत्वाची ठरली आहे. मात्र महंमद काझींच्या निधनानंतर काझी गट विस्कटल्याने हा गट राजकीय प्रवाहातून काही प्रमाणात मागे पडला. त्यामुळे नगरपालिका असताना किंवा सध्याची महापालिका मिरजेच्या कारभाराची चावी नायकवडी, जामदार आणि आवटी यांच्यातच राहिल्याचे दिसते. अनेक वेळा मिरज पॅटन सोयीस्कर राजकारणासाठी वापरले जाते. मात्र, मिरज पॅटर्नमुळे शहरातील कोणत्याच समस्या गेल्या अडीच दशकात संपले नसल्याचे शहराच्या दुरावस्थेवरुन लक्षात येते.

शहरात स्वच्छतेचा बोजवारा... 

शहरातील स्वच्छतेचा प्रश्न हा जुनाच आहे. प्रत्येक चौकात पुर्णत: भरलेली लोखंडी कचराकुंडी व त्या शेजारी पसरलेल्या कचर्यात चरत असलेली जनावरे हे चित्र सर्रास सर्वत्र पहावयास मिळतो. आरोग्य विभाग कचरा उठाव कधीच गांभिर्याने घेत नाही. त्यामुळे कचरा उठाव होण्यास कधी-कधी सायंकाळही होते. तोपर्यंत कचरा कुंडीतून गल्लीत सर्वत्र पसरलेला असतो. कचरा उठाव करणारे अनेक कर्मचारी कारभार्यांच्या घरकामास तैनात केलेले असतात. हे आता उघड झाले आहे. त्यामुळे कचरा उठावसाठी कर्मचारी अपुरे पडतात. हे सुध्दा कचरा उठाव वेळेवर न होण्याचे कारण आहे. त्यामुळे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याने शहरातील कचरा उठाव प्रश्न कायम ऐरणीवर राहिला आहे. 

खराब व अरुंद रस्ते पाचवीला पुजलेले... 

शहरातील रस्त्यांवर गेल्या२७ वर्षात सुमारे २०० कोटीहून अधिक निधी खर्च झाला. मात्र, एकही रस्त्या सुस्थितीत नसल्याने शहराला खड्डे पाचवीला पुजलेले आहेत.  रस्त्यावर खड््डे आणि अरुंद रस्ते यामुळे प्रमुख चौकासह सर्वत्र वाहतूक कोंडीची समस्या जटील होत आहे. शिवाय बंद पडलेले सिग्नल यंत्रणा आणि चुकीच्या पध्दतीने करण्यात आलेले चौकातील आर्यलँड यामुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडत आहे. याला महापालिका आणि वाहतूक नियंत्रण शाखा या दोहोंमधील विसंवाद हे सुध्दा एक महत्वाचे कारण आहे. शहरात रेल्वेसह अन्य दळणवळणाची मुबलक सुविधा उपलब्ध आहे. मात्र, वाहतूक कोंंडीच्या समस्येमुळे वाहनधारकांबरोबरच उद्योजकही हैराण झाले आहेत. याचा परिणाम नव्या उद्योग उभारणीवर होत आहे. 

भाजी मंडईचा प्रश्न खितपत... 

मिरज मार्केट परिसरात रस्त्यावर भाजीपाला बाजारामुळे वाहतूक कोंडी समस्या बिकट बनत चालली आहे. लोणी बाजार, दत्त्त चौक, बालगंधर्व नाट्यगृह, गाडवे चौक आदी परिसरात भाजीबाजार रस्त्यावरच भरला जातो. गेल्या अनेक वर्षापासून भाजी मंडईचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. बाजार हटविण्यावरâन भाजीपाला विक्रेते आणि प्रशासनामध्ये संघर्ष नित्याचा झाला आहे. निवडणुकांमध्ये कारभार्याकडून सुसज्ज भाजीमंडई उभारण्याचे आश्श्वासन दिले जाते. मात्र, राजकीय साठमारीतून हा प्रश्न खितपत पडला आहे. 

कालबाह्य पाणी व ड्रेनेज पाईपलाईनमुळे गॅस्ट्रोची लागण... 

शहरात टाकण्यात आलेल्या पिण्याच्या  पाईप लाईनची २७ वर्षे आणि ड्रेनेज पाईप लाईनची २८ वर्षापूूर्वी आयुष्यमर्यादा संपली आली आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे ड्रेनेज आणि पिण्याच्या पाईप लाईनचा सर्रासपणे वापर सुरुच आहे. याचे कारभाNयांना आणि प्रशासनाला कसलेच गांभिर्य नाही. मात्र, याचे दुष्परिणाम शहराला भोगावे लागत आहे. पाईपला गळती होउâन शहराला वारंवार दुषित पाणी पुरवठा होऊनही गॅस्ट्रो आणि कॉलर्यासारख्या जीवघेण्या आजाराची साथ वारंवार उद्दभवते. यावर आजअखेर तोडगा काढता आला नाही.  

मिरज मार्केटसह उद्यानांची दुरावस्था... 

शहराला ऐतिहासिक मिरज मार्केटचा वारसा  लाभला आहे. मात्र, या वास्तुची डागडुजी गेल्या अनेक वर्षापासून झाली नसल्याने वास्तू जीर्ण झाली आहे. तसेच शहरातील डॉ. आंबेडकर उद्यानासह सर्वच उद्यानांची दयनीय अवस्था झाली आहे. मिरजकरांना विसावा घेण्यासारखे शहरात एकही ठिकाण नाही.  

बालगंधर्व  नाट्यगृह बनला कबाडखाना... 

कोट्यावधी रुपये खर्चून बालगंधर्व नाट्यगृह बांधले. मात्र, नाट्यगृह बांधल्यापासून त्याचा उद्घाटनसह अनेक कारणांमुळे हे नाट्यगृह वादग्रस्तही ठरले आहे. नाट्यगृहासाठी आवश्यक नियमांचे पालन केले नसल्याने या नाट्यगृहामधील कार्यव्रâमावरâन अनेक वेळा महापालिका आणि महसूल विभागात वाद झाला आहे. अद्यापही या विषयावर समाधानकारक तोडगा निघालेला नाही. त्यामुळे नाट्यगृहाकडे दुर्लक्ष होउâन हे नाट्यगृह कार्यालयातील जुनी कागदे ठेवण्याचे कबाडखानाच बनले आहे.

मिरजेतील पदाधिकारी आणि त्यांचा कालावधी...  

डॉ. राजेंद्र मेथे – उपमहापौर (एक वर्ष), सौ. जायेदा इनामदार - उपमहापौर (दोन वर्षे), कै. दादासाहेब लांडगे – उपमहापौर (दोन  वर्षे), विजयराव धुळूबुळू – महापौर (सव्वा वर्ष), इद्रिस नायकवडी – स्थायी समिती सभापती (एक वर्ष) व महापौर (अडीच वर्षे) , सौ.बबीता मेंढे – उपमहापौर (दोन वर्षे), किशोर जामदार- स्थायी समिती सभापती (एक वर्ष) व महापौर (तीन वर्षे),  मैनुद्दीन  बागवान – महापौर (सव्वा वर्ष),  विवेक कांबळे – महापौर ( सव्वा वर्ष)

सुरेश आवटी, महादेव कुरणे, मकरंद देशपांडे, संजय मेंढे, पांडुरंग कोरे, संदीप आवटी, निरंजन आवटी, संगीता हारगे - स्थायी समिती सभापती (प्रत्येकी एक वर्ष)

मिरज सुधार समिती हिच परमानेंट विरोधी पक्ष... 

महापालिकेत कोणत्याही पक्षाची सत्ता असो, प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेनासह अन्य राजकीय पक्ष  नागरी प्रश्नांवर आंदोलन केल्याचे दिसत नाही. मिरजेतील नागरी प्रश्नांवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाशी दोन हात करण्याची तयारी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांची असते. त्यामुळे मिरज शहरात सत्ताधारी विरोधात मिरज सुधार समिती हिच परमानेंट विरोधी पक्ष असल्याची  मिरजकरांची भावना बनली आहे.