yuva MAharashtra छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा वसंतदादा आणि मदन पाटील मोठे होते का...?

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा वसंतदादा आणि मदन पाटील मोठे होते का...?



छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा वसंतदादा आणि मदन पाटील मोठे होते का...? 


सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका मुख्यालयातील वसंतदादा पाटील सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुकलाम आझाद, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक आदी महापुरुषांसह देशाच्या विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे आदींची प्रतिमा लावलेली आहेत. 

या महापुरुषांच्या फोटोच्या रांगेत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि माजी मंत्री मदन पाटील यांच्या सुद्धा प्रतिमा लावलेल्या आहेत. विशेष म्हणजे महापुरुषांची फोटो लहान आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि माजी मंत्री मदन पाटील यांच्या प्रतिमा मोठ्या लावलेल्या आहेत. महापालिका प्रशासनाने ज्या पद्धतीने सभागृहात प्रतिमा लावलेल्या आहेत.. ते पाहता छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि माजी मंत्री मदन पाटील यांचे "कर्तृत्व" मोठे आहे का असा प्रश्न पडतो... अशा पद्धतीने प्रतिमा लावताना महापालिका अधिकाऱ्यांनी अक्कल गहाण ठेवली असल्याचे दिसते. 😡