विधानपरिषद पावसाळी अधिवेशन - घरपट्टी शास्ती माफीबाबत महत्त्वपूर्ण मागणी
पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतीच्या घरपट्टीतील शास्ती माफीसंदर्भातील विधेयकावर विधानपरिषदेत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान विधानपरिषदेचे आमदार मा. श्री. इद्रिस नायकवडी यांनी एक महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला.
ते म्हणाले की, “या विधेयकामध्ये केवळ नगरपालिका व नगरपंचायतीचाच समावेश असून, महानगरपालिकांना वगळण्यात आले आहे. विशेषतः सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना फेरमूल्यांकनाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नागरिकांनी त्यावर हरकती दाखल केल्या असताना सुनावणी न घेता थेट पक्की घरपट्टीची बिले देण्यात आली आहेत. ही प्रक्रिया जाचक असून, ती त्वरित रद्द करण्यात यावी.”
मा. आमदार इद्रिस नायकवडी यांनी राज्य शासनाकडे मागणी केली की, महानगरपालिकांचाही या शास्ती माफीच्या विधेयकात समावेश करावा, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळू शकेल.