🟣 मिरजेत पुन्हा असे ’'' जनाब ''’ होणे नाही...
🟣 हजरजबाबी गुणविशेषमुळे जनाबांना आमदारकीने कायम हुलकावणी दिली...
◆ मिरजेचे जेष्ठ नेते व माझे मार्गदर्शक जनाब ईलियास नायकवडी यांची आज सहाव्या पुण्यतिथी या निमित्ताने....
◆ मिरजेसह जिल्ह्यात जनाब या नावाने कोणी परिचित असेल तर, ते केवळ जनाब इलियास नायकवडी... आपल्या प्रभावी वक्तृत्व, हजरजबाबीबाणा, समोरच्या व्यक्तीला आपल्या वेगळ्या प्रभावशाली वाणीने भुरळ घालण्याची शैलीमुळे जनाब यांनी राजकीय पटलावर कधीही न जुळणारी राजकीय समीकरणे घडवून दाखवली.
◆ वास्तविक मिरजेच्या राजकीय पटलांवर काझी व नायकवडी ही दोन राजकीय घराणे एकमेकांचे विरोधक म्हणूनच अधिक ओळखले जातात. आमचे आधारवड माजी नगरसेवक कै. महंमद काझी (बावा) यांचे अनेक विषयावर जनाबांशी वैचारिक मतभेद होते. मात्र, समाजासाठी अनेक चांगल्या उपक्रमांसाठी जनाब आणि बावा हे दोघे एकत्र आल्याचे मी पाहिले आहे. बावांचा कोणताही ’मेसेज’ असेल तर, ते जनाब यांच्यापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी माझी असे. त्यामुळे काझी गट व नायकवडी गट हे दोन्ही राजकीय विरोधक असताना विविध कारणांमुळे जनाब यांच्याशी वारंवार माझा संवाद होऊन एक ऋणानुबंंध तयार झाला होता.
◆ मी पत्रकारिता सुरु केल्यानंतर मिरजेच्या सामाजिक आणि राजकीय विषयाबाबत माझ्या मनात काही प्रश्न निर्माण मी मनमोकळेपणाने जनाबांशी चर्चा करत. जनाब सुध्दा माझ्या शंकांचे समाधान योग्य त्या उदाहरणासह करत असत. त्यांंच्याशी वारंवार घडणाऱ्या संवाद व सहवासामुळेच मी एक जागृत सामाजिक कार्यकर्ता म्हणून नावारूपास आलो.
◆ ज्यावेळी मी विधी शाखेची पदवी घेऊन वकिली क्षेत्रात प्रवेश केला. 26 जानेवारी 2019 रोजीच्या माझ्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला जनाब यांना आमंत्रण देण्यासाठी गेलो असता, मी विधी शाखेची पदवी घेतल्याचे समजताच त्यांना एक सुखद धक्का बसला. ’काझी लोकां भी कायदे की बात जानतींय’ असे म्हणत त्यांनी माझे अभिनंदन केले.
◆ जनाब यांना आमंत्रण देऊन आलो मात्र, जनाबांची प्रकृती अस्वस्थामुळे ते कार्यक्रमाला येतील की नाही याबाबत माझ्या मनात शंका होती. मात्र, कार्यक्रमाच्या दिवशी जनाब यांच्या चालकाचा फोन आला की जनाब कार्यक्रमाला येत आहेत. त्यावेळी माझ्यासह काझी भावंडांना आश्चर्याचा धक्का बसला. जनाब कार्यक्रमाला आल्यानंतर आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावरील हावभाव ओळखून जनाब कार्यालयाच्या पायऱ्या चढत म्हणाले, ’कार्यक्रम को आनेवालों की लिस्ट में मेरा नाम नही है, मुझे मालुम है फिर भी मैंं आया’ असे म्हणत परत आम्हा काझी भावंडांची आणि मिरज सुधार समिती कार्यकर्त्यांची फिरकी घेतली.
◆ माझ्या कार्यालयात सुमारे अर्धातास बसून विविध विषयांवर आमच्याशी मनमोकळेपणाने बोलले. कदाचित जनाब यांचा हा शेवटचा उद्घाटन कार्यक्रम असेल.
◆ आमदारकीसाठी पात्र असलेल्या निकषांमध्ये तंतोतंत बसत असतानाही जनाब यांच्या हजरजबाबी बाणामुळे नेत्यांनी त्यांना आमदारकीपासून लांब ठेवलं, हे शल्य माझ्यासह प्रत्येक मिरजकरांच्या मनात राहिली. मात्र, त्यांचे पुत्र इद्रिसभाई नायकवडी यांनी जनाब यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्नपूर्ती करत विधानपरिषद आमदारकी पटकावली.
◆ अशा मोठ्या मनाचा, राजकारण व समाजकारण यात कधीच गल्लत न करणारे गुरूवर्य जनाब पुन्हा कधीच मिरजेच्या राजकिय पटलावर होणे नाही... 😢
जनाब यांना आमच्या मिरज सुधार समिती परिवाराकडून मन:पुर्वक विनम्र अभिवांदन...
अल्लाह त्यांना स्वर्गात स्थान देवो हीच प्रार्थना.
ऍड. ए. ए. काझी, मिरज.
संस्थापक - मिरज सुधार समिती