yuva MAharashtra ◆ गुन्हेगारमुक्त मिरज रेल्वे जंक्शनसाठी पाठपुरावा करणार ◆ रेल्वे प्रवासी संघाच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा निर्धार

◆ गुन्हेगारमुक्त मिरज रेल्वे जंक्शनसाठी पाठपुरावा करणार ◆ रेल्वे प्रवासी संघाच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा निर्धार

 ◆ गुन्हेगारमुक्त मिरज रेल्वे जंक्शनसाठी पाठपुरावा  करणार

◆ रेल्वे प्रवासी संघाच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा निर्धार

◆ अध्यक्षपदी नरेश सातपुते तर, कार्यवाहपदी जहीर मुजावर यांची निवड

--------------------------------


-------

महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना जोडणारा मिरज रेल्वे जंक्शन हे अंमल पदार्थ विक्रीचे केंद्र बरोबरच गुन्हेगारांचा अड्डाच बनला आहे. दररोज दिवसाढवळ्या प्रवाशांना लुटले जाते. त्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे. म्हणून मिरज जंक्शन गुन्हेगारमुक्त करण्यासाठी वरिष्ठ प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्धार मिरज सुधार समिती संलग्न रेल्वे प्रवासी संघाच्या नुतन पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

महाराष्ट्र दिनादिवशी गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलमध्ये रेल्वे प्रवासी संघाची बैठक संस्थापक अ‍ॅड. ए. ए. काझी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. रेल्वे प्र्रवासी संघाच्या अध्यक्षपदी नरेश सातपुते, उपाध्यक्षपदी वसीम सय्यद, अभिजीत दाणेकर, सचिवपदी जहीर मुजावर आणि खजिनदारपदी दिनेश तामगावे यांची निवड करण्यात आली.

कोल्हापूर, सांगलीसह बेळगांव, घटप्रभा, कुडची सारख्या छोट्या स्थानकांचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. मात्र, महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन महत्वाच्या राज्यांना जोडणाऱ्या मिरज रेल्वे जंक्शनचा विकास राजकीय उदासिनतामुळे रखडला आहे. मध्य रेल्वेकडून मिरज जंक्शनकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे.

 मिरजेत पिटलाईनचे काम पुर्ण झाले असताना पुणे स्थानकाच्या गाड्या मिरज पर्यत विस्तार करण्याची मागणी केली. तसेच, कोरोना काळात बंद केलेल्या कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेस, मिरज-बेल्लारी एक्स्प्रेस,  कोल्हापूर-हैेद्राबाद एक्स्प्रेस, कोल्हापूर-पुणे सह्याद्री एक्स्प्रेस पनवेलमार्गे मुंबईला सोडण्याची आणि मिरज-परळी या गाडीला पूर्वी प्रमाणे रेग्युलर पॅसेंजर बोगी व स्लिपर बोगी बसविणे आदी मागण्यांसाठी तसेच जनप्रबोधनातून मिरज जंक्शनच्या विकासासाठी लढा उभारण्याचा निर्धार यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आला.

बैठकीस मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे, रामलिंग गुगरी, असिफ निपाणीकर, संतोष जेडगे, सिध्दार्थ पोळ, तौफिक देवगिरी, जावेद शरिकमसलत, शब्बीर बेंगलोरे, सलीम खतीब, अफजल बुजरूक, युसूफ निशानदार, आयुब निशानदार, झीशान मुश्रीफ, अजीम बागवान, शमशोद्दीन देवगिरी आदी सदस्य उपस्थित होते.