मिरज सुधार समितीचे संकेतस्थळ जनता आणि प्रशासनातील दुवा ठरेल
पृथ्वीराजबाबा पाटील यांचा विश्वास
ऐतिहासिक नगरी असताना सुध्दा मिरज शहराचा अपेक्षित विकास झाला नाही, हे मान्य करावे लागेल. मात्र, मिरज सुधार समिती सारख्या सामाजिक संघटना अग्रेसर होऊन काम करीत असल्याने विकासाबाबत आश्वासक वातावरण निर्माण होत आहे. मिरज सुधार समितीचे संकेतस्थळ हे जनता आणि प्रशासनामधील दुवा ठरेल, असा विश्वास गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र दिनानिमित्त मिरज सुधार समितीने मिरज शहरासह तालुक्यातील नागरी प्रश्न जाणून घेण्यासाठी तसेच, नागरिकांना विविध शासकीय माहिती उपलब्ध करून देण्यासाठी संकेतस्थळ सुरू केले आहे. त्याचे उदघाटन पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या हस्ते "आयएमए" अध्यक्ष डॉ. रियाज मुजावर, महापालिका सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला, महापालिका माजी कर अधीक्षक नितीन शिंदे, ऍड. इर्शाद पालेगार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी मिरज सुधार समितीचे संस्थापक ऍड. ए. ए. काझी यांनी संकेतस्थळमध्ये नागरीकांसाठी दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली. याप्रसंगी डॉ. प्रताप भोसले, प्रा. एन. डी. बिरनाळे, ऍड. बसवराज बेळंकी, राकेश कोळेकर यांच्यासह मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे, उपाध्यक्ष संतोष जेडगे, कार्यवाह असिफ निपाणीकर, सहकार्यवाह अभिजित दाणेकर, खजिनदार : रामलिंग गुगरी, सदस्य जहीर मुजावर, नरेश सातपुते, सिध्दार्थ पोळ, अशोकसिंग रजपूत, वसीम सय्यद, तौफिक देवगिरी, श्रीकांत महाजन, सलीम खतीब, अजीम बागवान, शब्बीर बेंगलोरे, अफजल बुजरूक, युसूफ निशाणदार, योगेश वडेरा, झीशान मुश्रीफ, सौ. सुनीता कोकाटे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.