◆
मिरज पंचायत समितीत कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नेमा
◆ मिरज सुधार समितीची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मागणी
------------------------------------------------------------
मिरज पंचायत समिती कार्यालयात गेल्या सहा महिन्यांत प्रभारी चार गटविकास अधिकारी झाल्याने येथील प्रशासकीय यंत्रणा ठप्प झाली आहे. म्हणून मिरज पंचायत समितीसाठी कायमस्वरूपी गट विकास अधिकारी नेमावी, अशी मागणी मिरज सुधार समितीच्या वतीने राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे यांच्याकडे केली आहे. यावेळी मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, अशोकसिंग राजपुत, नरेश सातपुते, रामलिंग गुगरी, अभिजित दाणेकर, वसीम सय्यद, तौफिक देवगिरी, सिद्धार्थ पोळ आदी उपस्थित होते.