महापालिकेची अक्कल शेण खायला गेली का...?
१) दत्त चौकातील लाकडी झाकण :
मिरज शहरातील मिरज महापालिकेेच्या हाकेच्या अंतरावर दत्त चौकात पावसाळ्याचे पाणी निचऱ्यासाठी मोठं ड्रेनेज केलं आहे. ड्रेनेजचे झाकण लाकडी ठोकळ्याचे असल्याने अवजड वाहने जाऊन हा लाकडी झाकण वारंवार तुटून त्यात पादचारी पडल्याचे प्रकार वारंवार घडतो. या ड्रेनेजचे वारंवार काम निघत असल्याने वर्षाचे 10 महिने या ड्रेनेजला बॅरिकेटचे संरक्षण असते. रात्री बॅरिकेटला धडकून दररोज अपघात घडत आहेत. गेल्या दहा वर्षात या क्षुल्लक समस्यावर महापालिकेला कायमस्वरूपी तोडगा काढता आलं नाही.
२) बालगंधर्व नाट्यगृहासमोरील ड्रेनेज
बालगंधर्व नाट्यगृहासमोर मुख्य रस्त्यावरच दोन ड्रेनेजचे सिमेंटचे चेंबर केले आहेत. हे चेंबर रस्त्याच्या उंचीपेक्षा सुमारे अर्धा फूट उंच असल्याने दिवसा या दोन्ही चेंबरला चुकविण्यासाठी वाहतूक कोंडी बरोबरचे वाहने एकमेकांना घासून अपघात घडतात. मात्र, रात्री ही दोन्ही चेंबर दिसत नसल्याने दुचाकी बरोबर चारचाकी वाहने या चेंबरला धडकून अपघात घडत आहेत.
दत्त चौक असो की ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या बालगंधर्व नाट्यगृहासमोरील या महत्त्वाच्या रस्त्यावर अश्या पद्धतीने चेंबर करताना या महापालिका अधिकारी आणि काम करणाऱ्या ठेकेदाराची अक्कल शेण खायला गेली होती का..? असा प्रश्न सर्वसामान्य मिरजकरांना पडला आहे. 🙁😡