yuva MAharashtra पर्यावरण कायदा 1986 चे संशोधन करण्याची गरज 🔴 डॉल्बी बंदीसंदर्भात मिरज सुधार समितीच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद 🔴 आमदार सना शेख यांची विधानसभेत अतिशय समर्पक लक्षवेधी सूचना

पर्यावरण कायदा 1986 चे संशोधन करण्याची गरज 🔴 डॉल्बी बंदीसंदर्भात मिरज सुधार समितीच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद 🔴 आमदार सना शेख यांची विधानसभेत अतिशय समर्पक लक्षवेधी सूचना

 


🔴 पर्यावरण कायदा 1986 चे संशोधन करण्याची गरज 

🔴 डॉल्बी बंदीसंदर्भात मिरज सुधार समितीच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद 

🔴 आमदार सना मलिक-शेख यांची विधानसभेत अतिशय समर्पक लक्षवेधी सूचना


गणेशोत्सवासह अन्य उत्सव काळात डॉल्बी व लेझर लाइट्समुळं घडलेल्या मृत्यूच्या व दुखापतींच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मिरज सुधार समिती सारख्या अनेक पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी डॉल्बी आणि लेजरवर बंदी घालण्याची तसेच, पर्यावरण कायदा 1986  मध्ये संशोधन करून डॉल्बीच्या आवाज मर्यादा (डेसीबल) मध्ये बदल करण्याची मागणी लावून धरली आहे.

लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत घातक असलेली डॉल्बी साउंंड सिस्टिम, लेझर प्रकाशझोत व एलईडी लाइटच्या वापरावर तातडीनं निर्बंध घाला, अशी मागणी विधानसभेत केली जात असते. मात्र, राजकीय स्वार्थापोटी याची अंमलबजावणी केली जात नाही, हे आजवरचे चित्र आहे.

डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाचा त्रास रुग्णालयात व घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांना, ज्येष्ठ नागरिकांना, लहान बालकांना होतो. कधी कधी लहान बालकांचे आणि ज्येष्ठांचे हृदयाचे ठोके वाढतात, हृदयाची गती वाढते, रक्तदाब वाढतो, कानाच्या पडद्यावर आघात होतात आणि याचा विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतो. डॉल्बीमुळं पुण्यातील हिंजवडी, सांगलीतील तासगाव व वाळवा इथं झालेल्या तरुणांच्या मृत्यूचे दाखलेही त्यांनी दिले आहेत.

गणेशोत्सव बरोबरच लग्न समारंभ, यात्रा व इतर छोट्या-मोठ्या कार्यक्रमांतही डॉल्बी लावण्याची अतिशय चुकीची पद्धत रूढ होऊ लागली आहे. पोलिसांकडून काही वेळा जनआग्रहास्तव आवाजाच्या मर्यादा पाळण्याच्या अटीवर परवानगी दिली जाते. पण ही मर्यादा पाळली जात नाही, हे उघड सत्य आहे. हे चित्र बदलण्यासाठी डॉल्बी, लेझर प्रकाशझोत आणि एलईडी लाईटचा सार्वजनिक ठिकाणी वापर करण्याबाबत कठोर निर्बंध आणण्याची व यासाठी काही नियम घालून देण्याची गरज आहे. सरकारनं पुढाकार घेऊन याबाबत तातडीनं कार्यवाही करावी, अशी मागणी आहे. 

याच मागणीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या आमदार सना शेख यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडताना पर्यावरण कायदा 1986 मध्ये संशोधन करून डॉल्बीच्या आवाज मर्यादा (डेसीबल) ठरविण्याची मागणी केली आहे. 

आमदार सना मलिक-शेख यांच्या या लक्षवेधी सूचनामुळे मिरज सुधार समितीसह अन्य सामाजिक संघटनांनी डॉल्बी आणि लेजर बंदी विरोधात करत असलेल्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे आशादायक चित्र आहे.