yuva MAharashtra 🔴 मिरजेतील राजीव गांधी नगरात नागरी सुविधा द्य 🔴 मिरज सुधार समितीचे महापालिका उपायुक्तांना निवेदन

🔴 मिरजेतील राजीव गांधी नगरात नागरी सुविधा द्य 🔴 मिरज सुधार समितीचे महापालिका उपायुक्तांना निवेदन

 


🔴 मिरजेतील राजीव गांधी नगरात नागरी सुविधा द्या

🔴 मिरज सुधार समितीचे महापालिका उपायुक्तांना निवेदन 



मिरज शहरातील राजीव गांधीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदिव्यांसह अन्य नागरी सुविधा पुरवण्याबाबत मिरज सुधार समितीच्या वतीने उपायुक्त स्मृती पाटील यांना निवेदन देण्यात आले. 

 मंगळवारी मिरज सुधार समितीचे मंगळवारी मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, उपाध्यक्ष संतोष जेडगे, कार्यवाह असिफ निपाणीकर, जहिर मुजावर, नरेश सातपुते, तौफिक देवगिरी, शब्बीर बेंगलोरे, अझीम बागवान, अभिजीत दाणेकर, वसीम सय्यद, सलीम खतीब आदी सदस्यांनी महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांची भेट घेतली. त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  मिरज शहरातील राजीव गांधीनगरकडे जाण्यासाठी रेल्वे पुल (२८०/३) या रेल्वे पुलाखालून जावे लागते. राजीव गांधी नगर परिसरात सुमारे १० हजारहून अधिक लोकवस्ती आहे. राजीव गांधीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदिवे गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहेत. अनेक ठिकाणी पथदिव्यांचे खांब वाकलेले आहेत.

या रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने सुर्यास्तानंतर राजीव गांधीनगरकडे जाणाऱ्या रहिवाशांची विशेषत: महिलांमध्ये भितीचे वातावरण आहे. अंधाऱ्याचा गैरफायदा घेत दररोज किरकोळ वाटमारीचे प्रकारही घडत आहेत. बंदावस्थेत असलेले पथदिवे पूर्वत सुरू करण्याबाबत तसेच, या भागात आरोग्यासह अन्य नागरी सुविधा पुरविण्याबाबत योग्य उपाययोजना करण्याची मागणी मिरज सुधार समितीच्या वतीने करण्यात आली आहे.