🔴 मिरजेत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा...
🔴 मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते आक्रमक
🔴 महापालिका आरोग्यधिकाऱ्यांना विचारला जाब
__________________________________________
मिरज शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद होऊन गल्ली-बोळात लहान मुले, वयोवृद्ध व्यक्तींचा चावा घेत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महापालिका काय उपाययोजना करत आहे? असा जाब विचारत मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे आणि डॉग व्हॅन अधिकारी अतुल आठवले यांना विचारत फैलावर घेतले. याबाबत दोन दिवसांत सर्व समावेशक बैठक लावून उपाययोजना करण्याचे आश्वासन आरोग्याधिकारी डॉ. ताटे यांनी मिरज सुधार समितीला दिले.
मिरज शहर व उपनगरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. अनेक चिकन, मटणसह मांसाहारचे उष्टे तसेच, टाकावू पदार्थ कचराकुंडीत टाकले जात आहे. त्यामुळे शहरातील भटकी कुत्री हिंस्र होत असल्याचे चित्र आहे.
भटक्या कुत्र्यांबाबत महापालिकेकडे ठोस उपाययोजना नाही. डॉग व्हॅन केवळ नावालाच आहे. त्यामूळे शहरात दररोज कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रकार घडत आहेत. म्हणून सोमवारी मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, नरेश सातपुते, तौफिक देवगिरी, अफजल बुजरूक, संतोष जेडगे, वसीम सय्यद, अझीम बागवान, सुभान सौदागर आदी सदस्यांनी आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे आणि डॉग व्हॅन अधिकारी अतुल आठवले यांना जाब विचारत फैलावर घेतले.