ज्यावेळी आमदार सत्यजितभाऊ देशमुख मिरज सुधार समितीच्या कार्याची माहिती घेतात...तेंव्हा....
शुक्रवारी शिराळाला एका कामानिमित्त जाणं झालं...शिराळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मिरज सुधार समितीचे संस्थापक ऍड. ए. ए. काझी, रेल्वे प्रवासी संघ अध्यक्ष नरेश सातपुते यांनी आमदार सत्यजितभाऊ देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली. आमदार सत्यजितभाऊ यांनी मिरज सुधार समितीच्या कार्याची कुतूहलाने माहिती घेतली.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी मिरज सुधार समितीने महात्मा गांधी चौकात केलेल्या आमरण उपोषण आंदोलनाचा उल्लेख आमदार सत्यजितभाऊंनी केल्यावर आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसला शिवाय, भाऊंच्या स्मरणशक्तीचा परिचय आला... सांगली जिल्ह्याच्या एका कोपऱ्यात असलेल्या डोंगर दऱ्यात असणाऱ्या इतका मोठा नेता मिरज सुधार समितीच्या कार्याची माहिती जाणून असल्याचे पाहून बरं वाटलं. 🥰
Swapnil Suhasrao Deshmukh