yuva MAharashtra 🟣 केवळ जे.सी.बी.नाही म्हणून थांबविणे हा कुठला शहाणपणा?

🟣 केवळ जे.सी.बी.नाही म्हणून थांबविणे हा कुठला शहाणपणा?





🟣 केवळ जे.सी.बी.नाही म्हणून थांबविणे हा कुठला शहाणपणा?
🟣 मिरज सुधार समितीची महापािलका पाणी पुरवठा अधिकाऱ्यांवर टीका
🟣 मुख्य जलवाहिनीला गळती लागून लाखो लिटर पाणी वाया

-----------------------------------------

मिरज शहरातील गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलजवळ डॉ. भालचंद्र पाटील ऑर्थोपेडिक हॉस्पिटलसमोर गेल्या पंधरा दिवसांपासून मुख्य जलवाहिनीला गळती लागून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. केवळ जे.सी.बी. नाही म्हणून काम न करणे हा कुठला शहाणपणा? अशी टिका मिरज सुधार समितीने केली आहे. नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या अशा केविलवाणी खुलासामुळे आयएआस दर्जाचा आयुक्त असलेल्या महापालिका प्रशासनाचा कारभार कशा प्रकारे ? सुरू आहे याचा परिचय येतो.

कुपवाड रोडवरील पाण्याची टाकीला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी डॉ. आंबेडकर उद्यान ते डॉ.परमशेट्टी हॉस्पिटलदरम्यान टाकण्यात आली आहे. गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलजवळ डॉ. भालचंद्र पाटील ऑर्थोपेडिक हॉस्पिटलसमोर गेल्या पंधरा दिवसांपासून मुख्य जलवाहिनीला गळती लागून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असून पाण्यामुळे दोन महिन्यांपूर्वी केलेला रस्ता सुध्दा खराब होत आहे. याबाबत मिरज सुधार समितीने पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे आणि शाखा अभियंता कुंभार यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत. 

मात्र, महापालिकेला सेवा देणाऱ्या जे.सी.बी. ठेकेदाराचे बिल थकित असल्याने  त्यांनी सेवा देण्यास नकार दिला.  त्यामुळे गळती काढण्याचे काम रखडले असल्याचे बेजबाबदार कारणे महापालिका पाणी पुरवठा अधिकारी देत आहेत. मग, केवळ जेसीबी ठेकेदाराचे बिल अदा झाल्यानंतरच ही मुख्य जलवाहिनीची गळती काढणार का? असा उपरोधिका टिका मिरज सुधार समितीने केली आहे. येत्या शुक्रवार दि.०८/०८/२०२५ रोजीपर्यंत या मुख्य जलवाहिनीची गळती न काढल्यास मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते गळती लागलेल्या ठिकाणी बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे आणि कार्यवाह असिफ निपाणीकर यांनी दिला आहे.