yuva MAharashtra 🟣 अधिकारी येत नसतील मिरज विभागीय कार्यालय बंद करा 🟣 मिरज सुधार समितीची नगरविकास मंत्र्यांकडे उद्दिग्न मागणी

🟣 अधिकारी येत नसतील मिरज विभागीय कार्यालय बंद करा 🟣 मिरज सुधार समितीची नगरविकास मंत्र्यांकडे उद्दिग्न मागणी

 



🟣 अधिकारी येत नसतील मिरज विभागीय कार्यालय बंद करा

🟣 मिरज सुधार समितीची नगरविकास मंत्र्यांकडे उद्दिग्न मागणी  

🟣 मिरज विभागीय कार्यालय अधिकारीविना कामकाज ठप्प 



----------------------------------------

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका मिरज विभागीय कार्यालयातील कोणत्याच विभागात अधिकारी भेटत नसल्याने कर्मचाऱ्यांवर कोणताचेच अंकुश नाही. मिरज विभागीय कार्यालयाचा कारभार रामभरोसे झाल्याने याचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मिरज विभागीय कार्यालयात अधिकारी येत नसतील तर, मिरजेचे कार्यालय बंद करून टाका अशी उद्दिग्न मागणी मिरज सुधार समितीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सांगली शहरा एवढाच मिरज शहराचा भौगोलिक क्षेत्र व लोकसंख्या आहे. मिरज विभागीय कार्यालयात अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, बांधकाम, नगररचना, घरपट्टी, जन्म-मृत्यू, जलनिस्सारण हे प्रमुख विभाग आहेत. मात्र, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांकडे सांगली मुख्यालयातील अतिरिक्त कार्यभार आहे. तर, बांधकाम, नगररचना, घरपट्टी, जन्म-मृत्यू, जलनिस्सारण विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे अन्य विभागाचे पदभार असल्याचे कारण सांगत अधिकारी मिरज विभागीय कार्यालयात फिरकत नाहीत.

 अधिकारी जागेवर नसल्याने कर्मचारी बेलगाम झाले आहेत. सहाय्यक आयुक्तपद हे कनिष्ठ लिपीक असलेल्या कर्मचाऱ्याकडे असल्याने सहाय्यक आयुक्तांना निर्णय घेण्याचे अधिकारच नाही. जन्म-मृत्यू कार्यालयात नागरिकांची प्रचंड गर्दी झालेली असते. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारीच नसल्याने मिरज विभागीय कार्यालय रामभरोसे झाले आहे.

मिरज विभागीय कार्यालयात अधिकारी येण्यास उत्सुक नसेल शिवाय, आयुक्त सत्यम गांधी यांना मिरज विभागीय कार्यालयाच्या कामकाजाबद्दल स्वारस्य नसेल, तर मिरज विभागीय कार्यालय बंद करून टाका, अशी उद्दिग्न मागणी मिरज सुधार समितीने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी मिरज सुधार समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, कार्यवाह असिफ निपाणीकर, नरेश सातपुते, तौफिक देवगिरी, वसीम सय्यद, सलीम खतीब, संतोष जेडगे, अभिजीत दाणेकर आदी सदस्य उपस्थित होते.