yuva MAharashtra 🔴 अखेर जलवाहिनीची गळती काढली 🔴 मिरज सुधार समितीच्या आंदोलनाचा इशाऱ्यानंतर पाणीपुरवठा विभागाला जाग...

🔴 अखेर जलवाहिनीची गळती काढली 🔴 मिरज सुधार समितीच्या आंदोलनाचा इशाऱ्यानंतर पाणीपुरवठा विभागाला जाग...

 


🔴 अखेर जलवाहिनीची गळती काढली

🔴 मिरज सुधार समितीच्या आंदोलनाचा इशाऱ्यानंतर पाणीपुरवठा विभागाला जाग...

-----------------------------------------------

मिरज शहरातील गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलजवळ डॉ. भालचंद्र पाटील ऑर्थोपेडिक हॉस्पिटलसमोर गेल्या पंधरा दिवसांपासून मुख्य जलवाहिनीला गळती लागून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात होता. याबाबत मिरज सुधार समितीने महापालिका पाणीपुरवठाकडे पाठपुरावा करीत होती. मात्र, जे.सी.बी. नसल्याचे कारण देत पाणीपुरवठा विभागाने गळती काढण्यासाठी चालढकल केले जात असल्याने मिरज सुधार समितीने शुक्रवार दि. 08/08/2025 रोजीचे अल्टीमेटम देत आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेत गुरुवारी पाणीपुरवठा विभागाने जेसीबी उपलब्ध करत तातडीने गळती काढून घेतले.

महापालिका पाणीपुरवठा विभागाचे मनःपूर्वक आभार... 🙏🤝