🟣 मिरजेतील प्रश्नांसंदर्भात मिरज सुधार समितीची आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्याशी संवाद
🟣 मिरज महापालिका इमारतीच्या नुतनीकरणासह विविध विषयांवर केली चर्चा
----------------------------------------------------------------
मिरजेतील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मिरज सुधार समितीने शहरातील विविध लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांशी भेटीचा संवाद अभियान सुरू केला आहे.
बुधवारी मिरज सुधार समितीचे अॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, नरेश सातपुते, असिफ निपाणीकर, तौफिक देवगिरी, वसीम सय्यद, जावेद शरिकमसलत, शब्बीर बेंगलोरे, अभिजीत दाणेकर, संदीप हंकारे, संतोष जेडगे, सलीम खतीब, मुस्तकिम शेख आदी पदाधिकाऱ्यांनी आमदार इद्रिसभाई नायकवडी यांची भेट घेतली.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका मिरज विभागीय कार्यालय इमारत नुतनीकरणासाठी भरीव निधी मिळण्यासाठी विनंती केली. तसेच, मिरज न्यायालय इमारत, संथगतीने होत असलेल्या भाजीमंडईचे काम, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामात अडथळा ठरणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची भिंत हटविणे तसेच, रस्ताशेजारील अतिक्रमण हटविण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून होणारी टाळाटाळ आणि शाहू चौक ते मिरज शहर पोलीस ठाणे, महात्मा गांधी चौक ते महाराणा प्रताप चौक, तसेच मंगळवार पेठ बॉम्बे बेकरी ते दिंडीवेस (कमान वेस), अब्दुल करीम खॉं चौक ते मिरज शहर पोलीस ठाणे, किसान चौक ते शास्त्री चौक या प्रमुख मार्गाचे रुंदीकरण होण्याबाबत येणाऱ्या तांत्रिक अडचणी व पाठपुरावा करण्याबाबत चर्चा झाली.
आमदार इद्रिसभाई नायकवडी यांनी मिरज सुधार समितीने मांडलेल्या विविध विषयांवर अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. शहरातील विविध विधायक कामे मार्गी लावण्यासाठी मिरज सुधार समिती करीत असलेल्या पाठपुराव्याबाबत कौतुक केले.
