yuva MAharashtra 🔴 सर्वसामान्य रुग्णांच्या हृदयाला स्पर्श करणारे ’स्पंदन’ हॉस्पिटल

🔴 सर्वसामान्य रुग्णांच्या हृदयाला स्पर्श करणारे ’स्पंदन’ हॉस्पिटल

 


🔴 सर्वसामान्य रुग्णांच्या हृदयाला स्पर्श करणारे ’स्पंदन’ हॉस्पिटल

🔴 मिरज सुधार समितीच्या पदाधिकाऱ्यांची स्पंदन हॉस्पिटलला सदिच्छा भेट



---------------------------------------------------------------------

डॉ. रियाज मुजावर सर आणि डॉ. शबाना मुजावर या मुजावर दांपत्याने आपल्या गोडवाणी तसेच औषधाबरोबरच व्यायाम कसे महत्वाचे आहे? हे स्वत: अनुभव घेत  रुग्णांची ’आरोग्यवर्धक’ सेवा करणारे मुजावर दांपत्याने अल्पावधित सांगली जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात आपल्या अथक परिश्रमाने स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्त्तर कर्नाटकात गरीबांचा डॉक्टर म्हणून प्रसिध्द हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रियाज मुजावर यांच्याकडे पाहिले जाते.  डॉ. रियाज मुजावर हे यशाचे शिखर सर करताना सावली प्रमाणे त्यांना साथ देणाऱ्या लहान मुलांचे तज्ज्ञ डॉ. शबाना मुजावर यांचा उल्लेख केल्याशिवाय डॉ. रियाज मुजावर यांचे वाक्य पुर्णच होऊ  शकत नाही. अशा मिरजकरांच्या ’’हृदयात’’ स्थान निर्माण करणारे डॉ. रियाज मुजावर आणि डॉ. शबाना मुजावर यांनी दि. १६ नोव्हेंबर२००५ आर्यन हार्ट केअर आणि जोया चिल्ड्रन केअरचा लावलेला  रुग्णसेवेचा रोप आता स्पंदन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल या नावाने वटवृक्ष होऊन सर्वसामान्य गरजु रूग्णांना सावली देण्याचे काम करीत असल्याचे पाहून एक मिरजकर म्हणून मनापासून समाधान वाटते.

हृदय विकारातील अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर म्हणून डॉ. रियाज मुजावर सरांचा लौकिक झाला. डॉ.उ मुजावर सर यांनी मिशन हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल येथे रूग्ण सेवा करीत आहेत. मिरज शहरात नव्याने झालेल्या युनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक आहेत.

सर्वसामान्य रूग्णांना विशेषत: हृदयरोग रूग्णांना मुंबई, पुणे, बेंगलोरमध्ये मिळणाऱ्या उच्च प्रतिच्या वैद्यकीय सेवा माफक दरात आपल्या मिरज शहरात उपलब्ध व्हावे, या उदात्त्त हेतूने डॉ. रियाज मुजावर सर आणि त्यांच्या पत्नी डॉ. शबाना मुजावर या मुजावर दांपत्यांनी डॉ. योगेश जमग सर, डॉ. अमित जोशी सर, डॉ. सचिन गावडे सर यांच्यासोबत मिरज-सांगली रोडवर, स्पंदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू  केले आहे.

गुरूवारी मिरज सुधार समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, कार्यवाह असिफ निपाणीकर, रामलिंग गुगरी, नरेश सातपुते, तौफिक देवगिरी, वसीम सय्यद, अभिजीत दाणेकर, सलीम खतीब, शब्बीर बेंगलोरे, संतोष जेडगे, संतोष हंकारे, सुभान सौदागर आदी पदाधिकाऱ्यांनी स्पंदन हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली. हॉस्पिटलचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रियाज मुजावर सर यांचा मिरज सुधार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. डॉ. मुजावर सर यांनी स्वत: फिरून हॉस्पिटलमध्ये रूग्णांना उपलब्ध करण्यात येत असलेल्या प्रत्येक सुविधांची इत्तंभुत माहिती सुधार समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली.  

सर्वसामान्य रूग्णांच्या हृदयाला स्पर्श करणारे ’स्पंदन’ हॉस्पिटल मिरजेच्या वैद्यकीय नगरीत भर घालणारे व सर्वसामान्यांची जीवनदायी हॉस्पिटल ठरेल, असा विश्वास मिरज सुधार समितीचे संस्थापक अ‍ॅड. ए. ए. काझी यांनी व्यक्त केले.



🔴 स्पंदन हॉस्पिटलचे वैशिष्ट्य

🔷 Philips IntelliVue X3 with CM 550 Advanced Monitoring System

🔷 हृदयाचे प्रगत मोजमाप (Cardiac Output Monitoring) 👈 हे उपकरण विशेषतः हृदयविकार, बालरुग्ण शस्त्रक्रिया तसेच उच्चस्तरीय न्यूरोसर्जरीसाठी अधिक सुरक्षितता प्रदान करते.

🔷 सतत ECG, SpO2, EtCO2, NIBP, IBP व तापमान तपासणी

🔷 रुग्ण ट्रान्स्फर दरम्यान डेटा न हरवता सलग मॉनिटरिंग

🔷 12 Lead ECG, ST Segment व Arrhythmia Analysis

🔷 रुग्णालयाच्या HIS व EMR शी थेट जोडणी.. 👈 ही दोन्ही मशीन्स मिळून सध्या जगभरात उपलब्ध असलेल्या अत्यंत परिष्कृत भूल प्रणालींपैकी आहेत. ज्या अगदी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेतही अचूकता, सुरक्षितता व अनुकूलता सुनिश्चित करतात.

प्रादेशिक आरोग्य सेवेत एक महत्त्वाचा टप्पा या नव्या सुविधा स्पंदन हृदयालय जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात अत्याधुनिक उपचारसेवेचे नवीन पर्व सुरू करत आहे.