🔴 महात्मा गांधी चौकातून पुढारी-अधिकारी डोळ्याला पट्टी बांधून जातात का...?
🔴 चौकातील विद्युत ट्रान्स्फरमर आणि बेकायदेशीर खोक्यांमुळे होतेय वाहतूक कोंडी..
मिरज शहरातील कायम डोळ्यावर पट्टी बांधून असलेले स्वयंघोषित कार्यसम्राट आणि त्यांना साथ देणारे प्रशासन अधिकाऱ्यांचे किती "गोडवे" गायलं तेवढं कमी आहे..
शहरातील अत्यंत महत्त्वाचा चौक असलेल्या महात्मा गांधी चौकातून सांगली, कुपवाड शहराकडे जाण्यासाठी जावे लागते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा रस्ता क्र.166 याच चौकातून जातो.. शिवाय, मिरज शासकीय रुग्णालय, मिशन हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल या प्रमुख हॉस्पिटलांसह अन्य सुमारे 100 हुन अधिक हॉस्पिटलला जाण्यासाठी याच चौकाचा वापर करावा लागतो. त्याचबरोबर कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांना मिरज औद्योगिक वसाहत आणि कुपवाड औद्योगिक वसाहतीला जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. असा अत्यंत महत्त्वाचा चौक असतानाही शहरातील भंपक पुढारी आणि कार्यशून्य अधिकाऱ्यांमुळे या चौकातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक वैतागले आहेत.
अशी परिस्थिती या चौकाची आहे. मात्र, या चौकातील वाहतुकीस अडथळा ठरणारे बेकायदेशीर महापालिकेचे मोव्हेंबल खोकी त्याच बरोबर कुपवाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर चौकातील महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचा विद्युत ट्रान्स्फरमर त्याशेजारी बेकायदेशीर खोक्यांनी वाढवलेला पसारा यामुळे चौकात सर्वत्रच वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, याची कसलेही सोयरसुतक शहरातील स्वयंघोषित कार्यसम्राटांना त्यांच्या ताटाखाली मांजर झालेल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना नाही.
यासाठी मिरज सुधार समिती आग्रही राहून या चौकातील वाहतुकीस अडथळा ठरणारा महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचा विद्युत ट्रान्स्फरमर स्थलांतर करणे आणि त्याशेजारी बेकायदेशीर खोकी हटविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे यांनी सांगितले.
