🔴रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात
🔴फ्लॅटफॉर्मवर अर्धवट कापलेल्या खांबाला धडकून प्रवाशी जखमी
-------------------------------------------------------------
मिरज रेल्वे जंक्शन प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रेल्वे प्रवशांचे जीव धोक्यात आले आहे. फ्लॅटफॉर्मवर अनेक ठिकाणी खांब अर्धवट कापलेले आहेत. गाडी धरण्याच्या नादात त्या खांबाला धडकून प्रवाशी बरोबरच रेल्वे हमाल सुध्दा जखमी होत आहे. मात्र, याचे कसलेही गांभिर्य रेल्वे बांधकाम विभागाला नसल्याने संबधित रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघ आणि मिरज सुधार समितीने रेल्वे प्रशासनाकडे केलेली आहे.
मिरज रेल्वे जंक्शनवरील काही फ्लॅटफॉर्मचे विस्तारिकरण करण्यात आले आहे. विस्तारिकरण करताना काही ठिकाणचे लोखंडी खांब कापून काढले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी जमिनीपासून अर्धाफुट उंच लोखंडी खांब अर्धवट कापलेले आहेत. ही खांब गाडीमध्ये बसण्याच्या घाईत असलेल्या प्रवाशांना दिसत नाहीत. या अर्धवट कापलेल्या लोखंडी खांबाला धडकून प्रवाशी जखमी होत आहेत. मात्र, याचे कसलेही गांभिर्य व सोयरसुतक रेल्वे प्रशासनाला नसल्याचे दिसते.
म्हणून अर्धवटरित्या काम करून प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कामाच्या ठेकेदार तसेच या कामाची जबाबदारी असलेल्या रेल्वे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष नरेश सातपुते आणि मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे यांनी मध्य रेल्वे पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात केले आहे.

