yuva MAharashtra मिरज रेल्वे जंक्शन फ्लॅटफॉर्मवरील "ते" अर्धवट कापलेले खांब हटविले

मिरज रेल्वे जंक्शन फ्लॅटफॉर्मवरील "ते" अर्धवट कापलेले खांब हटविले



🔴मिरज रेल्वे जंक्शन फ्लॅटफॉर्मवरील "ते" अर्धवट कापलेले खांब हलविले
🔴 रेल्वे प्रवासी संघाच्या इशाऱ्यानंतर रेल्वे प्रशासनास जाग


----------------------------------------
मिरज रेल्वे जंक्शन फ्लॅटफॉर्मवरील अर्धवट कापलेल्या खांबांना धडकून प्रवाशी बरोबरच रेल्वे हमाल सुध्दा जखमी होत असल्याचा प्रकार रेल्वे प्रवासी संघ आणि मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत खांब हटविण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा रेल्वे प्रशासनास दिला होता. याची दखल घेत सोमवारी रेल्वे प्रशासनाने ते अर्धवट कापलेले लोखंडी खांब हलविले आहेत. 

     मिरज रेल्वे जंक्शनवरील काही फ्लॅटफॉर्मचे विस्तारिकरण करण्यात आले आहे. विस्तारिकरण करताना काही ठिकाणचे लोखंडी खांब कापून काढले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी जमिनीपासून अर्धाफुट उंच लोखंडी खांब अर्धवट कापलेले आहेत. ही खांब गाडीमध्ये बसण्याच्या घाईत असलेल्या प्रवाशांना दिसत नाहीत. या अर्धवट कापलेल्या लोखंडी खांबाला धडकून प्रवाशी जखमी होत असल्याने याचे कसलेही गांभिर्य व सोयरसुतक रेल्वे प्रशासनाला नसल्याची टीका रेल्वे प्रवासी संघ आणि मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी केली होती.

      म्हणून अर्धवटरित्या काम करून प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कामाच्या ठेकेदार तसेच या कामाची जबाबदारी असलेल्या रेल्वे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तसेच, अर्धवट कापलेले खांब तात्काळ हटविण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष नरेश सातपुते, उपाध्यक्ष वसीम सय्यद आणि मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे आणि कार्यवाह असिफ निपाणीकर यांनी मध्य रेल्वे पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली होती. याची दखल घेत सोमवारी ते अर्धवट कापलेले लोखंडी खांब हटविण्यात आले.