yuva MAharashtra माजी महापौर मैनुद्दीन बागवान विरोधात न्यायालयात याचिका

माजी महापौर मैनुद्दीन बागवान विरोधात न्यायालयात याचिका

 



माजी महापौर मैनुद्दीन बागवान विरोधात न्यायालयात याचिका

पत्नीच्या नांवे थकित घरपट्टी आणि तिसरे अपत्याबाबत याचिकाकर्त्यांची तक्रार

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्र. ६ ड गटातून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेद्वार माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या विरोधात सांगली जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मिरज सुधार समितीच्या सदस्या सौ. अरिफा काझी आणि प्रभाग क्र. ६ अ गटातील एमआयएम पक्षाच्या उमेद्वार सौ. शाहिस्ता पिरजादे यांनी याचिका दाखल केली असून बागवान यांना तिसरे अपत्य असल्याचे तसेच, बागवान यांच्या पत्नीच्या नांवे थकित घरपट्टी असूनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मैनुद्दीन बागवान यांचा अर्ज अपात्र केले नसल्याची तक्रार याचिकामध्ये केली आहे.

यंदाची सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणूका अत्यंत चुरशीची झाली. उमेद्वारी छाननी वेळी प्रभाग क्र. ६ ड गटातील  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेद्वार मैनुद्दीन बागवान यांच्या विरोधात दोन हरकती दाखल झाल्या होत्या. त्यातील महापालिकेचे वाहन भाडे संदर्भात हरकतीवर सुनावणी झाली. मात्र, बागवान यांच्या पत्नी सौ. कौसर मैनुद्दीन बागवान यांच्या नांवे असलेल्या मिळकतीचे घरपट्टी थकित असल्याबाबत हरकत घेण्यात आली होती. नंतर हरकतकर्त्याने हरकत मागे घेतली. मात्र, सदर हरकतीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे सुनावणी घेणे आवश्यक असताना, सुनावणी न घेता बागवान यांचा अर्ज पात्र ठरवला. तसेच, मैनुद्दीन बागवान यांना तिसरे अपत्य असून सदर अपत्याबाबत बागवान यांनी त्यांच्या नामनिर्देशनपत्रात व प्रतिज्ञापत्रात माहिती लपविल्याची तक्रार मिरज सुधार समितीच्या सदस्या सौ. अरिफा काझी आणि प्रभाग क्र. ६ अ गटातील एमआयएम पक्षाच्या उमेद्वार सौ. शाहिस्ता पिरजादे यांनी अ‍ॅड. ए. ए. काझी यांच्या मार्फत जिल्हा न्यायालयात दोन वेगवेगळ्या दाखल केलेल्या याचिकेत केली आहे.

याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचे तिसरे अपत्याचा मुद्दा उपस्थित केल्याने या याचिकेबाबत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात उत्सुकता निर्माण झाली आहे.