मिरज बस स्थानक परिसरात फळ विक्रते काटा मारून प्रवाश्यांची फसवणूक करत त्याची लुबाडणूक करीत असल्याच्या तक्रार आपल्या मिरज सुधार समितीकडे वारंवार येत आहेत. म्हणून शनिवारी मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष नरेश सातपुते, उपाध्यक्ष तौफिक देवगिरी, कार्यवाह वसीम सय्यद, अमीर डांगे, शब्बीर बेंगलोरे, अय्याज मोमीन यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी काटामारी करणाऱ्या फळविक्रेत्यांचे वजनकाटे तपासून काटामारी आणि नासकी फळे प्रवाशांच्या माथी न मारण्याची समज दिली.
फळविक्रेत्यांबाबत कोणाची तक्रार असेल तर, त्यांनी 9850998500, 9579375426 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन मिरज सुधार समितीने केले आहे. मिरज सुधार समितीच्या या उपक्रमाचे प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.


