yuva MAharashtra मिरजेत वाहतुकीचे वाजले बारा .... मिरज वाहतूक नियंत्रण शाखा व महापालिकेचा गलथान कारभार

मिरजेत वाहतुकीचे वाजले बारा .... मिरज वाहतूक नियंत्रण शाखा व महापालिकेचा गलथान कारभार

 

🔵 मिरजेत वाहतुकीचे वाजले बारा 

🔵एकाच वेळी दोन रस्ते बंद असल्याने गांधी चौकात प्रचंड वाहतूक कोंडी

🔵 मिरज वाहतूक नियंत्रण शाखा व महापालिकेचा गलथान कारभार 

🔵 रस्ते खुले होईपर्यंत सिग्नल यंत्रणा बंद करण्याची मिरज सुधार समितीची मागणी 

---------------------------------------------------------------------

मिरज शहराला वाहतूक कोंडी पाचवीला पुजलेली आहे. शहरातील महत्वाचे चौक असलेले महात्मा गांधी चौकातील अतिक्रमण, अरुंद रस्ते आणि त्यात भर म्हणून सुरु असलेले सिग्नल यंत्रणामुळे नागरिक मेटाकुटीस आले आहेत.  

शिवाय, महापालिका आणि मिरज वाहतूक नियंत्रण शाखेच्या बेजबाबदार आणि गलथान कारभारामुळे सांगलीतून मिरजेत प्रवेशासाठी असलेले वंटमुरे कॉर्नर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंत रस्त्याचे काम आणि डॉ. परमशेट्टी हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर ड्रेनेजचे काम एकाच वेळी सुरु असल्याने ही दोन्ही रस्ते वाहतुकीस बंद आहेत. त्यामुळे गांधी चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने मिरज-सांगली रस्त्यावर सुमारे दोन-दोन किमी लांबीचे वाहनांचे रांगा लागत आहेत. मात्र, याचे कसलेही सोयरसुतक मिरज वाहतूक नियंत्रण शाखेला नसल्याचे दिसते. 

मिरज सुधार समितीची मागणी... 
वंटमुरे कॉर्नर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंत आणि डॉ. परमशेट्टी हॉस्पिटलसमोरील रस्त्याचे काम होईपर्यंत महात्मा गांधी चौकातील सिग्नल यंत्रणा बंद करुन वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी लावून वाहतूक कोंडी सुरळीत करावी, अशी मागणी मिरज सुधार समितीने महापालिका आयुक्त सत्यम गांधी आणि पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे  केली आहे.