yuva MAharashtra महात्मा गांधी चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मिरज सुधार समितीचा पुढाकार

महात्मा गांधी चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मिरज सुधार समितीचा पुढाकार

 


♦️  महात्मा गांधी चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मिरज सुधार समितीचा पुढाकार 

♦️ मिरज वाहतूक नियंत्रण शाखा आणि मिरज सुधार समितीची संयुक्त बैठक 

 ♦️ महात्मा गांधी चौकातील विजेचे ट्रान्सफर हलविण्यासाठी मिरज सुधार समितीचा पाठपुरावा 



----------------------------------------------------------------------

 शहरातील महत्वाचे चौक असलेले महात्मा गांधी चौकातील अतिक्रमण, अरुंद रस्ते शिवाय मिरज सांगली रोडवरील वंटमुरे कॉर्नर ते आंबेडकर उद्यान आणि डॉक्टर परमशेट्टी ते आंबेडकर उद्यान ही दोन्ही रस्ते बंद असल्याने महात्मा गांधी चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. म्हणून शुक्रवारी मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष नरेश सातपुते, समन्वयक शंकर परदेशीं, उपाध्यक्ष तोफिक देवगिरी, कार्यवाह वसीम सय्यद, राजेश पाटील, सुरेश झेंडे, दिनेश तामगावे, अमीर डांगे आदी सदस्यांनी मिरज वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीलगिड्डे यांची भेट घेतली. महात्मा गांधी चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत सविस्तर चर्चा केली. 

सांगलीकडून मिरजेकडे येणाऱ्या सिग्नलची वेळ मर्यादा वाढविणे, जड वाहतूक मैदा फॅक्टरी रोडमार्गे शहरा बाहेर वळविणे, गांधी चौकातील कुपवाड रोडकडे जाणाऱ्या रस्ता शेजारी वीज वितरण कंपनीचे ट्रांसफार्मर आणि त्यामागील अनाधिकृतपणे बसविण्यात आलेले मुवेबल खोकी यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होत आहे. याबाबत मिरज सुधार समिती विजेचे ट्रांसफार्मर बदलण्यासाठी वीज वितरण कंपनीकडे आणि मुव्हेबल खोके हटविण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करणार असल्याचे अध्यक्ष नरेश सातपुते यांनी सांगितले.