yuva MAharashtra मिरजेत कायद्याचा राज्य आहे का...?

मिरजेत कायद्याचा राज्य आहे का...?

मिरजेत कायद्याचा राज्य आहे का...?




मिरज रेल्वे जंकशनसमोर एका तरुणाला व्यापाऱ्याकडून बेदम मारहाण 

गेल्या काही दिवसांपासून मिरज रेल्वे जंकशनवर गुन्हेगार वृत्ती वाढली आहे. आता, गुन्हेगार बरोबरच या परिसरातील व्यापारी सुद्धा हातात काठी, पट्टे, लोखंडी साहित्य घेऊन मारहाण करीत परिसरात दहशत माजवीत असल्याचा  संतापजनक प्रकार समोर आला आहे. सोमवारी सकाळी मिरज जंकशनसमोरील हॉटेल व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले आहे. हा प्रकार काही जणांनी मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला. हा परिसर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. येथील प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे सारखे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असताना हॉटेल व्यवसायिक आणि व्यापाऱ्यांकडून एका तरुणाला खुलेआम बेदम मारहाण होत असेल तर.. मिरजेत कायद्याचे राज्य आहे का...? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. यावर पोलीस काय कारवाई करतात...? हे पहावे लागेल.