सामाजिक सलोखा जपण्यासाठी सामाजिक संघटनांचा सहभाग आवश्यक ... पोलीस अधीक्षक तुषार दोशी
मिरज सुधार स
मितीने घेतली सदिच्छा भेट
समाजात वाढणारी व्याभिचार आणि गुन्हेगारी प्रवृत्ती थांबवून सामाजिक सलोखा जपण्यासाठी मिरज सुधार समिती सारख्या सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत सांगली जिल्हा नुतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी व्यक्त केले.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी नुकतेच सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला. गुरुवारी मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष नरेश सातपुते, समन्वयक शंकरतात्या परदेशीं, उपाध्यक्ष तौफिक देवगिरी, कार्यवाह वसीम सय्यद, राजेश पाटील, सुरेश झेंडे, शमशोद्दीन देवगिरी, जॉन जोसेफ आदी सदस्यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सदिच्छा भेट घेतली. मिरज शहरातील विविध सामाजिक विषयांवर चर्चा केली. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक दोशी म्हणाले, पोलीस आणि जनता यातील महत्वाची भूमिका सामाजिक संघटना निभावतात.
समाजात वाढणारी व्याभिचार आणि गुन्हेगारी प्रवृत्ती थांबवून सामाजिक सलोखा जपण्यासाठी मिरज सुधार समिती सारख्या सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट मत सांगली जिल्हा नुतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी व्यक्त केले.
मिरज सुधार समितीच्या सदिच्छा भेटपूर्वीच सुधार समितीचा डेटा पोलीस अधीक्षकांकडे...
गुरुवारी मिरज सुधार समितीच्या सदस्यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी गेले असता, पोलीस अधीक्षकांना मिरज सुधार समितीच्या कार्याची माहिती अगोदरपासूनच असल्याचे दोषी यांनी स्पष्ट केले. श्री. दोषी यांनी समितीच्या कार्यकर्त्यांकडून शहरातील विविध बाबींची सविस्तर माहिती करून घेतली.
