🛑 हा कसला विकास.. ??? 😡☹️
🛑 मिरज सुधार समितीचा लोकप्रतिनिधी आणि महापालिकेला सवाल
मिरज शहरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये मिरासाहेब दर्गा कमान ते जवाहर चौक रस्त्याचे काम सुरू आहे हा रस्ता गतवर्षी 50 लाख रुपयांचा निधी करण्यात आला होता. या रस्त्यावरील अजून साईडपट्टी रेषा पुसलेल्या नसताना आणि शंभर टक्के सुस्थितीत असलेला हा रस्ता उकरून 12MM लोखंडी सळी वापरून काँक्रीट करण्याचे काम सुरू आहे.
यासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांच्या निधीचा चुराडा केला जात आहे. वास्तविक हा मार्ग गलेफ मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावर कोणत्याही प्रकारचे जड वाहने जात नाहीत. मग 12MM लोखंडी सळी वापरून हा रस्ता करून नेत्यांना नेमका कोणता विकास साधायचा आहे..? स्वतःचा का शहराचा...? असा प्रश्न सर्वसामान्य मिरजकरांना पडला आहे.
शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान रोड, वखारभाग रोड, मिरज मालगाव रोड आदी ठिकाणी जड वाहतूक असलेल्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असताना नेत्यांना नेमका सुस्थितीत असलेला रस्ता करून काय साध्य करायचं आहे..? आणि अशा चुकीच्या कामाला महापालिका बांधकाम विभागाचे अधिकारी नियमांना मूठमाती देऊन कशी देतात..?
यासर्व गैरप्रकाराचा पर्दापाश करण्यासाठी मिरज सुधार समिती आग्रही भूमिका घेऊन पाठपुरावा करणार आहे.
