yuva MAharashtra मिरज शहरातील विविध पेट्रोल पंपांची मिरज सुधार समितीकडून पाहणी

मिरज शहरातील विविध पेट्रोल पंपांची मिरज सुधार समितीकडून पाहणी

 




जनहितासाठी मिरज सुधार समितीचा विशेष उपक्रम 

मिरज शहरातील पेट्रोल पंपांवर ग्राहकांना कायद्यानुसार मिळणाऱ्या मोफत सुविधा प्रत्यक्ष उपलब्ध आहेत का…? याची पाहणी आज शनिवार रोजी मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष नरेश सातपुते, समन्वयक शंकरतात्या परदेशी, उपाध्यक्ष तौफिक देवगिरी, कार्यवाह वसीम सय्यद, राजेश पाटील, शब्बीर बेंगलोरे, सुरेश झेंडे, शमशोद्दीन देवगिरी, अमीर डांगे, अभिजीत दाणेकर आदी कार्यकर्त्यांनी मिरज शहरातील विविध पेट्रोल पंपांना भेटी देत पाहणी केली. 



अनेक पंपावर ग्राहकांना पिण्याची पाण्याची व्यवस्था, वाहनांना हवा, शौचालय या मूलभूत सुविधा सुद्धा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. मिरज बस स्थानक परिसरातील एका पेट्रोल पंपावर एक अल्पवयीन मुलगा काम करत असल्याचे निदर्शनास आले. 

ज्या पेट्रोल पंपावर पिण्याची पाण्याची व्यवस्था, वाहनांना हवा, शौचालय या मूलभूत सुविधा उपलब्ध नाही त्या पेट्रोल पंप चालकांना मिरज सुधार समितीच्या वतीने निवेदन सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती करून 15 दिवसांचे अल्टीमेटम देण्यात येईल. तरीही, सुविधा उपलब्ध न केल्यास त्या पंपाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित कंपनीकडे कायदेशीर कारवाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सुधार समितीचे अध्यक्ष नरेश सातपुते यांनी सांगितले. 


✅ पिण्याचे स्वच्छ पाणी
✅ स्वच्छ शौचालय सुविधा
✅ मोफत हवा भरण्याची सुविधा
✅ First Aid Box
✅ Complaint Book
✅ इंधन मोजमाप तपासणी व्यवस्था
✅ सुरक्षा साधने व ग्राहक माहिती फलक
या सर्व बाबींची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली.