yuva MAharashtra पोलिस राज खतीब दहा वर्षापासून करत होता बोगसगिरी... " हजेरी " सांगली पोलिसात, ’’सेवा’’ मात्र, मुंबईत...?

पोलिस राज खतीब दहा वर्षापासून करत होता बोगसगिरी... " हजेरी " सांगली पोलिसात, ’’सेवा’’ मात्र, मुंबईत...?

 


पोलिस राज खतीब दहा वर्षापासून करत होता बोगसगिरी... 

" हजेरी " सांगली पोलिसात,  ’’सेवा’’ मात्र, मुंबईत...? 

मिरजेचा उचापतीखोर पोलीस कर्मचारी महंमदगौस उर्फ राज खतीब गेल्या दहा वर्षापासून मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त बनून सर्वसामान्य नागरिकांबरोबरच काही राजकारणी, बिल्डर, हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांची सुध्दा आर्थिक फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. याचा तपास सहारा पोलीस ठाण्याचे पोलीस तसेच, मुंबई युनीट -१ चे पोलीस  करीत आहेत. राज खतीब हा सांगली पोलीस दलात नोकरीस असतानाही पुर्ण वेळ मुंबईत कसा असायचा? याचे गौडबंगाल काय? या सर्व बाबींची चौकशी होण्याची गरज आहे.  

राज खतीब हा पोलीस उपायुक्त असल्याचे सांगत तसेच, पोलीस उपायुक्त पदाचा बनावट ओळखपत्र तयार करुन लोकांचा विश्वास संपादन करायचा. मंत्रालयात तसेच, विविध पोलीस ठाण्यात प्रलंबित कामे मार्गी लावून देतो म्हणून आर्थिक फसवणूक करीत असल्याची माहिती समोर आली आहे. हा राज खतीब हा इतका मूर्ख बुध्दीचा होता की, त्याने या बोगसगिरीत आपल्या स्वत:चा मुलगा मसहब यालाही गुंतविले. मसहबच्या नावाने सुध्दा बोगस पोलीस अधिकार्‍याचे ओळखपत्र तयार केला होता.  

राज खतीब याने मुुंबईतील एका व्यक्तीला कर्ज मंजूर करुन देण्याच्या बहाण्याने १०  लाखांची लुबाडणूक झाल्यानंतर राज खतीबचे बोगसगिरीचे बिंग  फुटले.  राज खतीब पुन्हा अशाच एका प्रकरणात मांंडवली (तडजोड) करताना मुंबई क्राईम ब्रॉच पोलिसांनी त्याच्या मुलासह अन्य एकाला अटक केली.  



पोलिस कर्मचारी राज खतीबची हजेरी सांगलीत मात्र,  ’’सेवा’’ मुंबईत...

पोलीस कर्मचारी राज खतीब याने सुमारे दहा वर्षापासून अधिक काळ सांगली जिल्हा पोलीस दलात कार्यरत होता. मात्र, मुंबई क्राईम ब्रांच पोलिसांच्या म्हणण्यानुसार राज खतीब हा गेल्या दहा वर्षापासून बोगस पोलीस उपायुक्त म्हणून मुंबईत अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. राज खतीब याची हजेरीची नोंद सांगली पोलीस दलात  होत असताना तो कर्तव्याचा दिवशी मुंबईत कोणती ’’सेवा’’ देत होता...? हा संशोधनाचा विषय आहे. राज खतीब हा सांगली पोलीस दलात कर्तव्यावर नसताना त्याची हजेरी कशी मांडली जात होती...? यात सांगली पोलीस मुख्यालयातील ’’प्राविण्य’’ मिळविलेल्या ’’यादवी’’ विचारांचे पोलीस कर्मचार्‍यांचाही सहभाग असल्याची माहिती मिरज सुधार समितीला मिळाली आहे. या सर्व प्रकाराची सविस्तर चौकशी होण्यासाठी मिरज सुधार समितीच्या वतीने कोल्हापूर परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा आणि सांगली पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांची भेट घेणार असल्याचे मिरज सुधार समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी यांनी सांगितले.