yuva MAharashtra मिरजेच्या गणेश तलावाची श्वेतपत्रिका काढा

मिरजेच्या गणेश तलावाची श्वेतपत्रिका काढा

 🔵 मिरजेच्या गणेश तलावाची श्वेतपत्रिका काढा

🔵 दरवर्षी गणेशोत्सवानंतर गाळ उपसा करा 

🔵 मिरज सुधार समितीची मागणी 

------------------------------ 

गणेश तलाव सुशोभिकरण व पाणी शुध्दीकरणाच्या नावाखाली कोट्यावधी रूपये खर्च करुनही गणेश तलावात कोणतीच सुधारणा झालेली नाही. पाणी प्रदुषित होऊन वारंवार मासे मृत्यूमुखी पडून परिसरात आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. म्हणून आजअखेर गणेश तलावावर खर्च करण्यात आलेल्या निधीची श्वेतपत्रिका काढावी, अशी आग्रही मागणी मिरज सुधार समितीने महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त सई धडस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.



दोन दिवसांपूर्वी गणेश तलावातील पाणी प्रदुषित होऊन सुमारे दिड टनहून अधिक मासे मृत्यूमुखी पडले आहेत, ही समस्या वारंवार निर्माण होते.  गणेश तलाव सुशोभिकरण आणि पाणी शुध्दीकरणासाठी कोट्यावधी रुपये खर्च झाले. मात्र, गणेश तलावाची दुरावस्था पाहिल्यास हा निधी कोठे खर्च झाला? हा संशोधनाचा विषय आहे. 

दरवर्षी गणेशोत्सव व नवरात्रौत्सव झाल्यानंतर गणेश तलावातील गाळ काढून तलावातील नैसर्गिक झरे कार्यान्वित करावे, तलावातील पाणी शुध्दतेसाठी अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करावा. गणेश तलावाच्या भोवती ८ ते १० फुटी उंच जाळीचे कंपाउंड करण्यात यावे. गणेश तलाव अस्वच्छ करणार्‍या रहिवासी तसेच, खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी. गणेश तलावाच्या सुशोभिकरणासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्यात यावा, आदी मागण्या मिरज सुधार समितीच्या वतीने करण्यात आल्या आहेत. 



यावेळी अ‍ॅड. ए. ए. काझी, कार्याध्यक्ष नरेश सातपुते, उपाध्यक्ष तौफिक देवगिरी, कार्यवाह वसीम सय्यद, सुरेश झेंडे, श्रीकांत महाजन, जोसेफ जॉन, संदीप हंकारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.