मिरज येथील शरद इन्स्टिट्यूटमधील मेकॅनिकल विभागाचे प्राध्यापक डॉ. अवेस्अहमद सय्यदनैमुतुल्ला हुसेनी यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचेकडून यांत्रिकी अभियांत्रिकी विषयात पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल मिरज सुधार समितीच्या वतीने जेष्ठ सदस्य रामलिंग गुगरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मिरज सुधार समितीचे संस्थापक ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, उपाध्यक्ष संतोष जेडगे, सहकार्यवाह अभिजित दाणेकर, सदस्य जहीर मुजावर, नरेश सातपुते, सिध्दार्थ पोळ, वसीम सय्यद, तौफिक देवगिरी, शब्बीर बेंगलोरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.