yuva MAharashtra सर्वांनाच " रिपोर्ट कार्ड" ची धास्ती....!! 🙄🙄

सर्वांनाच " रिपोर्ट कार्ड" ची धास्ती....!! 🙄🙄

 


सर्वांनाच " रिपोर्ट कार्ड" ची धास्ती....!! 🙄🙄

आमदार सुरेशभाऊंनी आपल्या बाबतीत प्रसारमाध्यमांतून छापून येणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक बातम्यांसाठी एक एजन्सी नेमल्याचे समजते. या एजन्सीच्या "रिपोर्ट कार्ड"वर त्या दैनिक किंवा इलेक्ट्रॉनिक चॅनेल्सचे "जाहिरात कार्ड" ठरते... त्यामुळेच काही स्वाभिमानी पत्रकार वगळता अन्य पत्रकार आ. सुरेशभाऊंना सादर होणाऱ्या "रिपोर्ट कार्ड" ची धास्ती घेतल्याचे दिसते..  

 कदाचित या "रिपोर्ट कार्ड" मुळेच भाऊंचा मंत्रीपद हुकल्याने आता भाऊंनी सुध्दा पक्षाच्या वरिष्ठांना सादर होणाऱ्या "रिपोर्ट कार्ड" ची धास्ती घेत..  हा "एजन्सी" चा प्रयोग केल्याचे दिसते...

अहो... भाऊ तुम्ही मतदारसंघात विधायक कामे केला असता तर, अश्या एजन्सी नेमण्याची वेळ तुमच्यावर आली नसती...

आता तरी, गंमत जंम्मत सोडून मिरज रेल्वे जंक्शन, मिरज औद्योगिक वसाहत, मिरज न्यायालय इमारत, भाजी मंडई, प्रलंबित छत्रपती शिवाजी महाराज रस्ता आणि शहरात केवळ चार प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण आदी विधायक विषयांवर लक्ष द्या...

 मग कोणत्याही "रिपोर्ट कार्ड" ची गरज ना... तुम्हाला लागणार आहे, ना... कोणा पत्रकारांना लागणार आहे...

आपल्या हक्काची...

मिरज सुधार समिती...

Tags