yuva MAharashtra गॅलक्सी" समोरील तळ्यारूपी खड्ड्यातील पाण्याचा निचरा करा - मिरज सुधार समितीची मागणी

गॅलक्सी" समोरील तळ्यारूपी खड्ड्यातील पाण्याचा निचरा करा - मिरज सुधार समितीची मागणी

  







🔴 "गॅलक्सी" समोरील तळ्यारूपी खड्ड्यातील पाण्याचा निचरा करा - मिरज सुधार समितीची मागणी

🔴 उपायुक्त विजया यादव यांना दिले निवेदन

🔴 जवाहर चौकापर्यंत पाईपलाईन टाकून प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची केली सूचना

______________________________________

     मिरज शहरातील जवाहर चौकहुन किल्ला भाग, तहसीलदार कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शहरातील उंच गॅलक्सी इमारतीसमोर तळ्यारुपी खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने पाण्याचा निचरा करण्याबाबत सोमवारी मिरज सुधार समितीने महापालिका उपायुक्त विजया यादव यांना निवेदन दिले आहे. 

निवेदनात म्हटले आहे, गॅलक्सी इमारतीसमोर मोठ्या प्रमाणात गुडघाभर पाणी साचून राहत असल्याने किल्ला भागातील तहसीलदार कार्यालय, मिरज न्यायालय, प्रांत कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, आदर्श शाळा, मिरज न्यायालय न्यायाधीश निवासस्थानाकडे जाणाऱ्या नागरिक विशेषतः महिला, लहान शाळेकरी मुले, वृद्ध यांची मोठी गैरसोय होत आहे.