yuva MAharashtra 🔴 अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीचा कर्दनकाळ ठरणाऱ्या पोलिसांचा योग्य सन्मान 🔴 महात्मा गांधी चौक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा महत्त्वाचा सहभाग 🔴 कारवाईत सातत्य ठेवण्याची गरज...

🔴 अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीचा कर्दनकाळ ठरणाऱ्या पोलिसांचा योग्य सन्मान 🔴 महात्मा गांधी चौक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा महत्त्वाचा सहभाग 🔴 कारवाईत सातत्य ठेवण्याची गरज...



🔴 अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीचा कर्दनकाळ ठरणाऱ्या पोलिसांचा योग्य सन्मान

🔴 महात्मा गांधी चौक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा महत्त्वाचा सहभाग

🔴 कारवाईत सातत्य ठेवण्याची गरज...

            मिरज शहर अवैध धंद्यांने जोर धरला आहे. त्यात गांजा आणि चरस सारख्या नव्या पिढीला बरबाद करणाऱ्या अवैध धंदेवालेबरोबरच व्यसनाधिन झालेल्यांनी कहरच केला होता. मात्र, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे सर आणि  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सर यांच्या पथकाने गांजा विक्री व वितरण करणारे टोळ्यांवर सातत्याने कठोर कारवाई करून त्यांचे कंबरडेच मोडले आहे. 

सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या दोन्ही प्रमुख अधिकाऱ्यांचा आणि अन्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 

ही बाब आम्हा मिरजकरांसाठी सुखद अनुभव देणारी आहे...  यानंतरही सतीश शिंदे सर आणि संदीप शिंदे सर आपल्याकडून अश्याच पध्दतीने गांजासह अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाईत सातत्य ठेवावी, हीच अपेक्षा...

आपल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा... 💐🤝