सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका प्रमाणे आता मिरज रेल्वे जंक्शन प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुद्धा टक्केवारीची लागण झाली असल्याचे दिसते.
मिरज रेल्वे जंक्शनच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 च्या सुशोभीकरणचे काम सुरू आहे. पंधरा दिवसांपूर्वी या फरशा बसविण्यात आले आहेत. मात्र, अवघ्या पंधरा दिवसांत या फरशा फुटून निघत आहेत. टाईल्स फरशीचे तुकडे टोकदार असल्याने फरशा रेल्वे प्रवाशांच्या पायांना लागून जखम होत आहे. याबाबत रेल्वे प्रवासी संघाने पुणे विभागीय कार्यालयाकडे तक्रार करून या कामाचा ठेकेदार आणि रेल्वे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.