🟣 आमदार सुरेशभाऊंचा कॉल आला आणि नालेसफाई मोहीम रखडली..
🟣 माहिती न घेताच आमदारांनी काम थांबविले
🔴 रूळाशेजारी सांडपाणी व पावसाचे पाणी साचल्याने रेल्वे रूळाला धोका
🟣 मिरज सुधार समितीच्या तक्रारीनंतर सुरू होते नालेसफाईचे काम
----------------------------------------
एखाद्या लोकप्रतिनिधीकडे नागरिक तक्रार घेऊन जाणार मात्र, त्या तक्रारीत सत्यता पडताळून पाहण्याची जबाबदारी त्या लोकप्रतिनिधीचे असते. मात्र, बुधवारी मिरज मतदारसंघाचे आमदार तथा माजी पालकमंंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी केवळ नालाशेजारी मिरज-म्हैसाळरोडलगत अनधिकृत झोपडपट्टीत राहणाऱ्या भाजप कार्यकर्त्याच्या ’आग्रहासाठी’ नालेसफाईबाबत कोणतेही सविस्तर माहिती न घेता राजीव गांधीनगर रोडपुलाजवळील रेल्वे रूळाशेजारी साचलेले सांडपाणी व पावसाचे पाणी प्रवाहीत करण्यासाठी सुरू असलेली नालेसफाईची मोहिम थांबविल्याचा प्रकार घडला.
साचलेल्या सांडपाणी व पावसाच्या पाण्याने रेल्वे रूळ खचून अपघात घडण्याची शक्यता असल्याने येथील साचलेले सांडपाणी प्रवाहित करण्यासाठी नालेसफाई करण्याची मागणी मिरज सुधार समितीने महापालिका प्रशासन आणि रेल्वे विभागाकडे केली होती.
मात्र, इतकी गंभीर समस्या असताना आमदार सुरेशभाऊ खाडे यांना एका कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर वस्तुस्थितीची माहिती न घेता तसेच, सदर काम करणे आवश्यक असल्याचे महापालिका अधिकारी सांगत असतानाही सदर नालेसफाईचे काम थांबविण्याची सुचना दिल्याने आमदार सुरेशभाऊची कार्यपध्दत पुन्हा चर्चेत आली आहे. तर, महापालिका सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला आणी इतर अधिकाऱ्यांना हात हलवत माघारी यावे लागले.