yuva MAharashtra 🟣 मिरज रेल्वे जंक्शनबाबत दुजाभाव का? 🟣 पुणे येथे रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत खासदार विशाल पाटील आक्रमक 🟣 मिरज सुधार समितीच्या मागण्यांची खासदार विशाल पाटील यांनी घेतली दखल

🟣 मिरज रेल्वे जंक्शनबाबत दुजाभाव का? 🟣 पुणे येथे रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत खासदार विशाल पाटील आक्रमक 🟣 मिरज सुधार समितीच्या मागण्यांची खासदार विशाल पाटील यांनी घेतली दखल

 


🟣 मिरज रेल्वे जंक्शनबाबत दुजाभाव का?

🟣 पुणे येथे रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत खासदार विशाल पाटील आक्रमक

 🟣 मिरज सुधार समितीच्या मागण्यांची खासदार विशाल पाटील यांनी घेतली दखल 

🟣 गैरसोयींच्या प्रश्नावर खासदारांनी रेल्वे अधिकाऱ्यांना विचारला जाब 


मिरज रेल्वे जंक्शन पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचे केंद्र आहे, मात्र या ठिकाणी अत्याधुनिक सोयी सुविधा देण्यात रेल्वेने नेहमी आखडता हात घेतला आहे. त्याचा तातडीने विचार करावा आणि जंक्शन विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी खासदार विशाल पाटील यांनी आज पुण्यात आयोजित पुणे, सोलापूर मंडलमधील खासदारांसोबत झालेल्या रेल्वे प्रशासनाच्या बैठकीत केली.

रेल्वेचे विविध प्रश्न समजून घेणे आणि त्याची सोडवणूक करण्यासाठी कृती आराखडा बनवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. खासदार विशाल पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील रेल्वेशी निगडीत विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडली. विशेषतः मिरज जंक्शनबाबत त्यांनी ‘टू द पॉईंट’ चर्चा केली. 

मिरज रेल्वे जंक्शनच्या विकासाबाबत मिरज सुधार समितीने खासदार विशाल पाटील यांना भेटून सविस्तर चर्चा केली होती

रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत खासदार विशाल पाटील  यांनी जाब विचारत मिरज रेल्वे जंक्शनवर फलाट क्रमांक एक वगळता २, ३, ४, ५, ६ या ठिकाणी प्रवाशांसाठी निवारा शेड अपुरे आहेत. पावसाळ्यात प्रवाशांची मोठी गैरसोय होते. सरकता जिना नाही. प्रवाशांना ओझ्या बॅग घेऊन जाणे अडचणीचे होते. फक्त एक, तीन, चार क्रमांकाच्या फलाटावर लिफ्ट आहेत. अन्यत्र त्या बसवायला हव्यात. पॅसेंजर  फलाट ५, ४ व २ या ठिकाणी उभ्या केल्याने दिव्यांग व ज्येष्ठ प्रवाशांचे हाल होतात. पार्किंगचा प्रश्न कित्येक वर्षांपासून तसाच आहे. पिण्याचे स्वच्छ पाणी नाही. फर्स्ट क्लाससाठी वेटिंग रुमचा अभाव आहे. स्वच्छतेचा बोजवारा असतो. पिटलाईनचे काम अद्याप पूर्ण नाही. जंक्शनमधील मॉलचे काय झाले कळत नाही. विशेष गाड्या सोडण्याबाबत नेहमी उदासिनता दाखवली जाते. चाईल्ड हेल्पलाईनला अपुरी जागा आहे. या परिस्थिती बदल होणार आहे की नाही?’’ अश्या स्वरूपाचे प्रश्न विचारून रेल्वे अधिकाऱ्यांची बोलती बंद केली. 



खासदार विशाल पाटील म्हणाले, ‘‘मिरज मॉडेल स्थानकाचे काम लवकर सुरु करावे. सांगली-परळी एक्स्प्रेस डेमूऐवजी आयसीएफ डब्याची सोडावी. भिलवडी स्थानकावरील एफओबी ताबडतोब बांधण्यात याव. ताकारी रेल्वे स्थानकास महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि कोयना एक्‍स्प्रेसचा थांबा द्यावा. मिरजमधून बेळगाव, लोंडा, कॅसलरॉक, हुबळीसाठी पॅसेंजर धावतात. त्या धर्तीवर पंढरपूर, कुर्डुवाडी, सातार पॅसेंटर गाड्या सुरु कराव्यात, आदी मागण्या केल्या.

------------------------------------

बैठकीतील प्रमुख मुद्दे

◆ जत-विटा-कराड रेल्वे लाईनसाठी सर्वेक्षण वेगाने करून निर्णय घ्यावा

◆ मिरज ते कोल्हापूर, मिरज ते पंढरपूर, मिरज ते पुणे या रेल्वे लाईवरील नवीन गाडी, पूल बांधकाम, अंडरपास रोड पावसाळ्यात पाण्याने भरून जातात, त्यावर उपाय योजनांची मागणी

◆ खासदारांच्या पत्रावर रेल्वेत तिकिटांचा काळाबाज होतो, तो थांबवण्याची सूचना

◆ कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाबाबत प्रश्न उपस्थित

◆ किर्लोस्करवाडी, वसगडे येथील पुलाचे काम अपूर्ण का? 

◆ सांगलीत चिंतामणनगर पुलावर पथदिवे का नाहीत?

◆ सांगली रेल्वे स्टेशनवर मालधक्क्यावर लागणाऱ्या रेल्वेंना प्लॅटफॉर्म, रॅक लवकरत मिळत नाहीत. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. 

---------------