yuva MAharashtra 🔴 मिरजेतील सर्वात उंच गॅलक्सीसमोरील "तळ्याचा" निकाल कोण लावणार....? 🔴 मिरज सुधार समितीचे तळ्यारुपी खड्ड्यात बसून आंदोलनाचा इशारा

🔴 मिरजेतील सर्वात उंच गॅलक्सीसमोरील "तळ्याचा" निकाल कोण लावणार....? 🔴 मिरज सुधार समितीचे तळ्यारुपी खड्ड्यात बसून आंदोलनाचा इशारा

 



🔴 मिरजेतील सर्वात उंच गॅलक्सीसमोरील "तळ्याचा" निकाल कोण लावणार....?

🔴 मिरज सुधार समितीचे तळ्यारुपी खड्ड्यात बसून आंदोलन नाचा इशारा

     मिरज शहरातील जवाहर चौकहुन किल्ला भाग, तहसीलदार कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शहरातील सर्वात उंच असलेल्या गॅलक्सी इमारतीसमोर  खड्डा झाला आहे. मुळात गॅलक्सी इमारतीचे बांधकाम खंदकात झाले आहे. ही इमारत बांधताना दोन्ही बाजूला उतार आणि मध्यभागी गॅलक्सी इमारत आहे.  या ठिकाणी पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याबाबत ना.. या गॅलक्सी इमारत बांधणाऱ्या बिल्डरने कोणतीच उपाययोजना केली नाही... ना... याबाबत निष्क्रिय असलेल्या महापालिका प्रशासनाने बिल्डरला विचारण्याची तसदी सुद्धा घेतली नाही... त्यामुळे गॅलक्सी इमारतीसमोर मोठ्या प्रमाणात गुडघाभर पाणी साचून राहत असल्याने किल्ला भागातील तहसीलदार कार्यालय, मिरज न्यायालय, प्रांत कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, आदर्श शाळा, मिरज न्यायालय न्यायाधीश निवासस्थानाकडे जाणाऱ्या नागरिक विशेषतः महिला, लहान शाळेकरी मुले, वृद्ध या सर्वांना जाण्यासाठी हाच सोयीस्कर रस्ता आहे. मात्र, गॅलक्सीसमोर पावसाचे पाणी साचून तळे तयार होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. आता या पाण्याचा निचऱ्याची जबाबदारी कोणाची हे निश्चित करावं, अन्यथा मिरज सुधार समितीला यात लक्ष घालावं लागेल. वेळ पडल्यास आंदोलन करावे लागेल असा इशारा मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे यांनी दिला आहे.