yuva MAharashtra 🔴 मिरजेत मिरवणुकीत हद्दपार गुन्हेगारांचा "काटा लगा" वर ताल

🔴 मिरजेत मिरवणुकीत हद्दपार गुन्हेगारांचा "काटा लगा" वर ताल

 


🔴 मिरजेत मिरवणुकीत हद्दपार गुन्हेगारांचा "काटा लगा" वर ताल

🔴 ९ व्या दिवशीच्या मिरवणुकीत तोंडावर रूमाल बांधून पोलिसांसमोरच नाच

🔴 मिरजेत हद्दपार गुन्हेगारांचा शहरात खुलेआम वावर

------------------------------------------------------------------

मिरजेत शनिवारी (दि.६) निघणाऱ्या ऐतिहासिक अनंत चतुर्थीच्या मिरवणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. डॉल्बीसह अन्य बाबींवर पोलीस प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. कायदा व सुव्यवस्था अबादित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने सुमारे दिडशेहून अधिक सराईत गुन्हेगारांचा हद्दपाराच्या नोटीसा दिल्या आहेत. तरीही, हद्दपाराच्या नोटीसा बजालेल्या सराईत गुन्हेगारांचा पोलिसांच्या नाकावर ठेचून शहरात खुलेआम वावर होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.

  इतकेच नव्हे तर, गुरूवारी ९ व्या दिवशी निघालेल्या एका श्रींच्या मिरवणुकीत लक्ष्मी मार्केट परिसरात "काटा लगा" गाण्यावर सराईत गुन्हेगार तोंडावर रूमाल बांधून ठेका धरल्याचे पहावयास मिळाले.

पुण्यात ९व्या दिवशीच्या श्रींच्या मिरवणुकीत राजकीय वैमनस्यातून टोळी युध्द भडकून भर मिरवणुकीत एकाचा खून करण्यात आला.  या पार्श्वभूमीवर शनिवारी निघणाऱ्या अनंत चतुर्थीच्या मिरवणुकीत पोलीस यंत्रणेला अशा सराईत हद्दपार गुन्हेगारांवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी प्रशासनाने घेणे आवश्यक असल्याचे मत मिरज सुधार समितीने मांडले आहे.