yuva MAharashtra 🟣 छत्रपती शिवाजी रस्त्यावरील खड्ड्यात पडून दुचाकीस्वार गंभीर जखमी

🟣 छत्रपती शिवाजी रस्त्यावरील खड्ड्यात पडून दुचाकीस्वार गंभीर जखमी

 



🟣 छत्रपती शिवाजी रस्त्यावरील खड्ड्यात पडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
🟣 छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे शुक्ल काष्ठ संपता संपेना
🟣रस्त्याच्या पूर्णत्वासाठी मिरज सुधार समिती पुन्हा आंदोलन उभारणार



      मिरज शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे शुक्ल काष्ठ संपता संपेना अशी गत झाली आहे. सोमवारी रात्री कच्छी हॉल जवळील रस्त्यावरील खड्ड्यात पडून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. असे अपघात दररोज घडत असतानाही याचे कोणतेही गांभीर्य राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन तसेच, खासदार, आमदारांना नसल्याची संतप्त टीका रस्त्याच्या पूर्णत्वासाठी पुन्हा नव्याने आंदोलन करण्याचा इशारा मिरज सुधार समितीने दिला आहे. 

 छत्रपती शिवाजी महाराज रस्ता अंदाजपत्रकाप्रमाणे होण्यासाठी कामात अडथळा ठरणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, शहरी बस स्थानक, महात्मा गांधी चौकातील मिशन हॉस्पिटल, शासकीय रुग्णालय आदी ठिकाणच्या भिंती हटविणे, 22 मीटर रस्ता रुंदीकरणसाठी खासगी मिळकतधारकांशी चर्चा करून जागा संपादित करणे, रस्त्याच्या दुतर्फा गटारी, रस्त्यामधील दुभाजक (डीवायडर) आदी कामे तातडीने मार्गी लावणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे पुन्हा रस्त्यावर खड्डे झाल्याने खड्ड्यात पडून अपघातांची मालिका पुन्हा सुरू झाली आहे.  

     सोमवारी रात्री कच्छी हॉल जवळील रस्त्यावरील खड्ड्यात पडून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. असे अपघात दररोज घडत असतानाही याचे कोणतेही गांभीर्य राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन बरोबरच खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे यांना नसल्याची संतप्त टीका मिरज सुधार समितीने केली आहे. 

     छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या पूर्णत्वासाठी पुन्हा नव्याने आंदोलन करण्याचा इशारा मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी यांनी दिला आहे. यावेळी अध्यक्ष राकेश तामगावे, कार्यवाह असिफ निपाणीकर, नरेश सातपुते, तौफिक देवगिरी, वसीम सय्यद, शब्बीर बेंगलोरे, अभिजीत दाणेकर आदी सदस्य उपस्थित होते.