🔴 आता मिरज-बेळगांव-हुबळी मार्गावर डेमू रेल्वे धावणार
🔴 ११ डव्याची डेमू १३ ऑक्टोबरपासून धावणार
🔴 मिरज-हुबळी सारख्या लांब पल्ल्यांच्या प्रवाशांची होणार गैरसोय
🔴 मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाची हरकत
मध्य रेल्वे प्रमाणे दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागाने मिरज-बेळगांव-हुबळी मार्गावर डेमू गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ११ डव्यांची ही डेमू १३ ऑक्टोबर पासून धावणार असल्याचे दक्षिण – पश्चिम रेल्वेने एका नोटीफिकेशनद्वारे जाहीर केले आहे. दरम्यान, मिरज-हुबळीचे अंतर तब्बल ८ तासांचे असल्याने या डेमू गाडीतील प्रवाशांची गैरसोय होणार असल्याची हरकत मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाने घेतली आहे.
मध्य रेल्वेने कोल्हापूर-मिरज-सातारा-पूणे मार्गावर डेमू ट्रेन सुरु केली आहे. याच धर्र्तीवर आता, दक्षिण-पश्चिम रेल्वे विभाग हुबळीने सुध्दा १३ ऑक्टोबरपासून मिरज-बेळगांव-हुबळी मार्गावर डेमू गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही डेमू ट्रेन ११ डब्यांची असणार असून सर्व डब्यामध्ये बैठक व्यवस्था (सिटींंग अरेंंजमेंट) असणार आहे. या डेमू ट्रेनला दोन्ही बाजूला इंजिन असल्याने इंजिन बदलण्याची गरज लागणार नसल्याने रेल्वेच्या वेळेत व यंत्रणेची बचत होणार आहे.
डेमूमुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांची होणार गैरसोय...
मध्य रेल्वेने कोल्हापूर-मिरज-सातारा-पूणे मार्गावर डेमू ट्रेन सुरु केली आहे. मात्र, मिरज-पुणे हे सुमारे २५० किमीचे अंतर असल्याने मिरजहून पुण्याला जायला ८ तासांचा वेळ लागत असल्याने कोल्हापूर-मिरज-सातारा-पूणे या डेमूला केवळ सातारापर्यंंतच प्रवाशी असतात. साताऱ्याहून पुण्यापर्यंंत ही गाडी पुर्णपणे मोकळीच धावते. त्याच प्रमाणे मिरज-हुबळीचे अंतर सुमारे २७९ किमी असल्याने मिरजेला येण्यास तब्बल ९ तासांचा कालावधी लागणार असल्याने या डेमू गाडीतील प्रवाशांची गैरसोय होणार असल्याने मिरज-बेळगांव-हुबळी ऐवजी केवळ मिरज-बेळगाव मार्गावरच डेमू ट्रेन सोडण्यात यावी अशी मागणी मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने दक्षिण – पश्चिम रेल्वेकडे करणार असल्याची माहिती रेल्वे प्रव्रासी संघाचे अॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष नरेश सातपुते़, उपाध्यक्ष वसीम सय्यद, मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे, कार्यवाह असिफ निपाणीकर यांनी दिली.
