yuva MAharashtra मिरज न्यायालय याचिकाबाबत सकारात्मक तोडगा काढा 🔴 मिरज सुधार समितीची मिरज संस्थानिक युवराज माधवराजेंकडे मागणी

मिरज न्यायालय याचिकाबाबत सकारात्मक तोडगा काढा 🔴 मिरज सुधार समितीची मिरज संस्थानिक युवराज माधवराजेंकडे मागणी

 



🔴 मिरज न्यायालय याचिकाबाबत सकारात्मक तोडगा काढा

🔴 मिरज सुधार समितीची मिरज संस्थानिक युवराज माधवराजेंकडे मागणी  

🔴 मिरज वकिल संघटना व युवराज माधवराजेंची संयुक्त बैठक होणार  



---------------------------------------------------------------------

मिरज न्यायालय इमारत जागेबाबत मुुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिके संदर्भात तोडगा काढून मिरज न्यायालयाच्या इमारतीचा विषय मार्गी लावावा, अशी विनंती मिरज सुधार समितीने मिरज संस्थानिक युवराज माधवराजे पटवर्धन यांची  भेट घेऊन केली आहे. याबाबत युवराज माधवराजे पटवर्धन हे मिरज वकिल संघटनेशी चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मिरज सुधार समितीच्या शिष्टमंडळाला दिली आहे.  

सध्या मिरज न्यायालय भाड्याने बीएसएनएल इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर असल्याने वयोवृध्द पक्षकारांसह नागरिकांची मोठी गैरसोय आहे. सांगली जिल्ह्यातील तालुकास्तरावरील सर्वात मोठा मिरज तालुका असूनही मिरज न्यायालयाचे कामकाज भाड्याच्या जागेत सुरु आहे.  मिरज न्यायालय इमारत जागेबाबत मिरज संस्थानिक श्रीमती उमादेवी पटवर्धन यांनी मुुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने मिरज न्यायालयाच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव शासन रखडला आहे. याचिकाकर्त्यां  श्रीमती उमादेवी पटवर्धन यांचे नुकतेच निधन झाल्याने मिरज संस्थानिकाचा कारभार युवराज माधवराजे पटवर्धन पाहत आहेत.

म्हणून गुरुवारी मिरज सुधार समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, उपाध्यक्ष संतोष जेडगे, कार्यवाह असिफ निपाणीकर, नरेश सातपुते, तौफिक देवगिरी, शब्बीर बेंगलोरे, दिनेश तामगावे, वसीम सय्यद, सलीम खतीब, संदीप हंकारे आदी सदस्यांनी मिरज संस्थानिक युवराज माधवराजे पटवर्धन यांची भेट घेत त्यांचा सत्कार करत मिरज शहरातील विविध विषयांवर चर्चा केली. तसेच, मिरज न्यायालय इमारत जागेबाबत मुुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिके संदर्भात तोडगा काढून मिरज न्यायालयाच्या इमारतीचा विषय मार्गी लावावा अशी विनंती केली असता, युवराज माधवराजे पटवर्धन हे मिरज वकिल संघटनेसोबत बैठक घेऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मिरज सुधार समितीला दिले.